30 C
Mumbai
Wednesday, April 17, 2024
Homeमहाराष्ट्रभाजप लोकांची माफी मागणार का? रोहित पवार यांचा सवाल

भाजप लोकांची माफी मागणार का? रोहित पवार यांचा सवाल

राज्यात वर्षभरापासून ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्सची भीती दाखवून धाड मारणे हा प्रकार सुरूच आहे. भाजप सरकारला भारत भ्रष्टाचारमुक्त बनवायचा होता. भाजपने भ्रष्टाचार घालवण्यासाठी नोटबंदी केली. यातून किती काळा पैसा बाहेर आला? याबाबत अजूनही भाजपने ठोस पुराव्यानिशी माहिती दिली नसल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे. हा सर्व कारभार लोकशाही मूल्य आणि तत्वांच्या अगदी विरोधी भूमिका घेणारा आहे. महाविकास आघाडी भ्रष्टाचार करत आहे. यासाठी त्यांच्या मागे इन्कम टॅक्स, ईडी लावण्यात आली. त्यांनाच सोबत घेऊन भाजपने सत्ता स्थापन केली आहे. याच मुद्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते आणि आमदार रोहित पवार संतापले आहेत.

राज्यात सत्ता संघर्षासाठी तोडा फोडीचे राजकारण सुरू आहे. सत्ताधारी आणि विरोधकांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरूच आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन गट झाले आहेत. दोन्ही पक्षात गट पडण्याआधी हसन मुश्रीफांवर ईडीच्या माध्यमातून कारवाई करण्यात आली होती. मात्र आता अजित पवार गटाने भाजपशी हात मिळवणी केली असता, भ्रष्टाचारी म्हणणाऱ्या भाजपनेच भ्रष्टाचाराला आपलेसे केले असल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे.


त्याचप्रमाणे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत भाजपने आपण विजय असल्याचा दावा केला आहे. तर दुसऱ्या बाजूला आगामी निवडणुका का लवकर घेतल्या जात नाहीत? असा सवाल महाविकास आघाडीकडून होत आहे. दरम्यान, महाविकास आघाडी सरकारच्या काळात भाजपने मुश्रीफांचे जगणे मुश्कील केले होते. यावर आता रोहित पवारांनी ट्विट करत आपली भूमिका स्पष्ट केली.

हे ही वाचा 

शिवरायांचा पुतळा आता काश्मीरमध्ये, मुख्यमंत्र्यांनी केले अनावरण

भुजबळांच्या नातेवाईकांचे हॉटेल त्यांच्याच माणसांनी फोडले?

‘महापालिका निवडणुका घ्यायला यांची हातभर फाटते…’ संजय राऊतांचा भाजपवर निशाणा

काय म्हणाले रोहित पवार?

ब्रिक्स इंडिया कंपनी ही हसन मुश्रीफ साहेब यांच्या जावयाची बेनामी कंपनी असून या कंपनीला कोणताही अनुभव नसताना बेकायदा पद्धतीने अप्पासाहेब नलावडे साखर कारखाना चालवण्यास दिल्याचा आणि मनी लाँड्रिंग झाल्याचा गंभीर आरोप मविआ सरकारच्या काळात भाजपकडून करण्यात आला होता. त्यासाठी त्यांनी पत्रकार परिषद आणि कोल्हापूर दौऱ्यांच्या माध्यमातून रान उठवलं आणि आज याच कंपनीला समाजकल्याण विभागाच्या वसतीगृहातील आणि निवासी शाळांमधील विद्यार्थ्यांना भोजन पुरवण्याचं कंत्राट देण्यात आलं असल्याची टीका रोहित पवारांनी सरकारवर केली. यामुळं राजकीय सोयीसाठी खोटे आरोप करुन लोकांची दिशाभूल केल्याबद्दल भाजप लोकांची माफी मागणार का? असा सवालही रोहित पवारांनी केला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी