26 C
Mumbai
Saturday, September 28, 2024
Homeमहाराष्ट्रशेतकऱ्यांची चिंता वाढली,कांद्याचे निर्यातबंदी हटवून 20 दिवस झाले तरीही दर जैसे थे

शेतकऱ्यांची चिंता वाढली,कांद्याचे निर्यातबंदी हटवून 20 दिवस झाले तरीही दर जैसे थे

सध्या राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आहे. कारण, कांद्याच्या दरात मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. कांद्यावरील निर्यातबंदी उठवून आज 20 दिवस झाले तरी देखील कांद्याच्या दरात वाढ होताना दिसत नाही. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहेत. बाजारपेठेत कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळं दरात घट झाली आहे. निर्यातबंदी हटवली असली तरी सरकारनं निर्यातीवर दोन अटी घातल्या आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कांदा महाग झाला आहे, मात्र, परदेशात निर्यात होत नसल्याने देशांतर्गत बाजारात आवक वाढली आहे.

सध्या राज्यातील कांदा (onion ) उत्पादक शेतकरी अडचणीत आहे. कारण, कांद्याच्या दरात मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. कांद्यावरील निर्यातबंदी उठवून आज 20 दिवस झाले तरी देखील कांद्याच्या दरात वाढ होताना दिसत नाही. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहेत. बाजारपेठेत कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळं दरात घट झाली आहे. निर्यातबंदी हटवली असली तरी सरकारनं निर्यातीवर दोन अटी घातल्या आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कांदा (onion ) महाग झाला आहे, मात्र, परदेशात निर्यात होत नसल्याने देशांतर्गत बाजारात आवक वाढली आहे.(Farmers’ anxiety increased, even after 20 days of removal of onion export ban, the prices remained the same)

केंद्र सरकारनं कांद्यावरील निर्यातबंदी उठवली खरी पण ती उठवताना काही अटी शर्ती घातल्या आहेत. त्यामुळं कांदा निर्यात करण्यास अडचणी निर्माण होत आहेत परिणामी देशात कांद्याचा पुरवठा जास्त होऊन दरात घसरण होत असल्याचं पाहायला मिळत आहे. सध्या शेतकऱ्यांना तोटा सहन करुन कंदा विकावा लागत आहे. आता खरीप हंगामातील पिकांच्या पेरणीची वेळ आली आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना पैशांची गरज आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील कांदा कवडीमोल भावाने विकत आहेत.

शेतकऱ्यांची मागणी काय?
सरकारनं निर्यात खुली होऊनही शेतमालाला अतिशय कमी भाव मिळत आहे. त्यामुळे आता निर्यातीवर लादलेली 550 प्रति टन किमान निर्यात किंमत आणि त्यावर लादलेले 40 टक्के निर्यात शुल्क काढून टाकण्याची मागणी शेतकरी करत आहेत. आता शेतकऱ्यांच्या या मागणीवर सरकार नेमका काय निर्णय घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

कांद्याच्या दरात मोठी घसरण
मिळालेल्या माहितीनुसार, शेतकऱ्यांना कांद्याचा किमान भाव केवळ 2 रुपये प्रति किलो इतका मिळाला. तर कमाल भाव 15 रुपये तर सरासरी 8.5 रुपये प्रति किलो होता. तिन्ही किमती किमतीपेक्षा कमी होत्या. कांद्याचा उत्पादन खर्च 18 रुपयांवरून 20 रुपये किलोपर्यंत वाढल्याचा दावा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी केला आहे. त्यामुळे 20 रुपयांपेक्षा कमी भाव असल्यास तोटा होतो. अशी माहिती शेतकऱ्यांनी दिली.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी