30 C
Mumbai
Thursday, September 19, 2024
Homeराजकीयपुणे अपघातातील अल्पवयीन आरोपीला वाचवण्यासाठी सरकारकडून यंत्रणेचा दुरुपयोग; संजय राऊत

पुणे अपघातातील अल्पवयीन आरोपीला वाचवण्यासाठी सरकारकडून यंत्रणेचा दुरुपयोग; संजय राऊत

पुण्यात अल्पवयीन आरोपीनं मद्यपान करुन सुसाट गाडी चालवत दोघांचे बळी घेतले. यानंतर याप्रकरणी विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं असताना, आज शिवसेनेकडून (ठाकरे गट) या प्रकरणी सरकारवर काही गंभीर आरोप करण्यात आले आहेत. या अपघातातील अल्पवयीन आरोपीला आणि त्यांच्या कुटुंबीयांना वाचवण्यासाठी मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री तसंच सरकारमधील मंत्री आणि महायुतीतील काही नेते यंत्रणाचा दुरुपयोग करत असल्याचा घणाघाती आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलाय. त्यांनी आज मुंबईत माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.

पुण्यात अल्पवयीन आरोपीनं मद्यपान करुन सुसाट गाडी चालवत दोघांचे बळी घेतले. यानंतर याप्रकरणी विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं असताना, आज शिवसेनेकडून (ठाकरे गट) या प्रकरणी सरकारवर काही गंभीर आरोप करण्यात आले आहेत. या अपघातातील अल्पवयीन आरोपीला आणि त्यांच्या कुटुंबीयांना वाचवण्यासाठी मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री तसंच सरकारमधील मंत्री आणि महायुतीतील काही नेते यंत्रणाचा दुरुपयोग करत असल्याचा घणाघाती आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलाय. त्यांनी आज मुंबईत माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते(Sanjay Raut) बोलत होते.(Misuse of machinery by govt to save minor accused in Pune accident; Sanjay Raut)

यावेळी बोलताना संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, “देशात सत्ताधारी भाजपा पक्षाकडून विरोधकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचा दुरुपयोग करुन विरोधी पक्षातील नेत्यांना तुरुंगात डांबलं जातय. अरविंद केजरीवाल यांना तुरुंगात टाकलं गेलं. मीही तुरुंगातून बाहेर आलोय. परंतु आम्ही घाबरणारे नाही. आम्ही लढणार आहोत आणि जे सत्य आहे ते बोलणारे आहोत.”देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ईडीला हाताशी धरुन विरोधकांना नामोहरम करत असल्याचा आरोप संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलाय. आम्ही लढणार आहोत आणि जे सत्य आहे ते बोलणारे आहोत.”देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ईडीला हाताशी धरुन विरोधकांना नामोहरम करत असल्याचा आरोप संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलाय.

देशात 4 जूननंतर चक्रं फिरतील : लोकसभा निवडणुकीचा निकाल 4 जूनला लागणार आहे. आज अंतिम आणि सातव्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. परंतु, 4 जूननंतर देशात सत्तांतर होईल, भाजपा सरकार जाऊन इंडिया आघाडीचं सरकार येईल असा विश्वास संजय राऊत (Sanjay Raut) यांनी व्यक्त केला. राहुल गांधी हे आमचे नेते आहेत आणि राहुल गांधी यांच्यासोबत संपूर्ण देशातील लोक आहेत, असं संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले.

27 कॅमेरे लावून ध्यानधारणा : लोकसभा निवडणूक प्रचाराची धामधूम संपल्यानंतर विश्रांती घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी कन्याकुमारीला जाऊन ध्यानधारणा करत आहेत. यावर संजय राऊत यांनी सडकून टीका करत म्हटलंय की, “मोठी सुरक्षा यंत्रणा आणि 27 कॅमेरे लावून पायाच्या नखांपासून ते डोक्याच्या केसांपर्यंत कॅमेरा लावत कोणी शूटिंग करुन ध्यानधारणा करत असतं का?” तसंच फक्त दिखाव्यासाठी मोदी ध्यानधारणा करत आहेत. मोदी ड्रामा करत असल्याची टीकाही संजय राऊत यांनी केली.मोदी ड्रामा करत असल्याची टीकाही संजय राऊत यांनी केली.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी