28 C
Mumbai
Sunday, September 22, 2024
HomeमुंबईNo Mask No Entry : मास्क नसल्यास बेस्ट बस, टॅक्सी, रिक्षामध्ये प्रवेश...

No Mask No Entry : मास्क नसल्यास बेस्ट बस, टॅक्सी, रिक्षामध्ये प्रवेश नाही

टीम लय भारी

मुंबई : कोरोना विषाणू संसर्गावर निंयत्रण मिळवण्यासाठी मास्क वापरण्यासंदर्भात जनजागृती सोबत मास्क न वापरणा-यांवर कारवाई करण्याचे निर्देश (No Mask No Entry) मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी मंगळवारी दिले.

मास्क नसल्यास सर्व बसेस, टॅक्सी, रिक्षा इत्यादीमध्ये प्रवाशांना प्रवेश देऊ नये. वाहनांमध्ये ‘मास्क नाही, प्रवेश नाही’; ‘नो मास्क, नो एन्ट्री’, अशा आशयाचे स्टीकर्स लावण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यास सांगण्यात आले आहे.

बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील सर्व कार्यालये, आस्थापना, मॉल्स, सोसायटी, सभागृह इत्यादी ठिकाणी ‘नो मास्क, नो एन्ट्री’ अशा आशयाचे फलक लावण्याचे निर्देश बैठकीत देण्यात आले आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी