30 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeमहाराष्ट्रउपमुख्यमंत्री अजित पवार कोरोनामुक्त

उपमुख्यमंत्री अजित पवार कोरोनामुक्त

टीम लय भारी

मुंबई l राष्ट्वादीचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार हे कोरोनामुक्त झाले आहे. त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयातून आज सोमवार (2 नोव्हेंबर) डिस्चार्जही देण्यात आला आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी व्हॉट्सअॅप स्टेट्सच्या माध्यमातून याची माहिती दिली आहे.

कोरोनाच्या काळात सतत दौऱ्यांवर होते. विविध ठिकाणी भेटी, मंत्रालयातील बैठका तसेच अतिवृष्टीच्या काळात फटका बसलेल्या भागाची पाहणी करण्यासाठी ते दौरे करत होते. याच दरम्यान त्यांना काहीसा थकवा जाणवत होता.

त्यामुळे ते चार-पाच दिवस होम क्वारंटाइन झाले होते. त्यानंतर कोरोनाची चाचणी केल्यानंतर ते पॉझिटिव्ह असल्याचे आढळले होते. त्यानंतर खबरादारीचा उपाय म्हणून त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं होतं. आता उपचारानंतर ते कोरोनामुक्त झाले असून रुग्णालयातून त्यांना डिस्चार्जही देण्यात आला आहे.

दरम्यान, घरी परतल्यानंतर ते आठ दिवस घरीच विश्रांती घेणार आहेत, अशी माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या व्हॉट्सअॅप स्टेट्सद्वारे दिली आहे. काही दिवसांपासून क्वारंटाइनमध्ये असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना 26 ऑक्टोबरला मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं.

अजित पवार यांना करोनाची लागण झाल्याचं निदान झाल्यानंतर रुग्णालयात हलवण्यात आलं. अतिवृष्टी झालेल्या भागाचा दौरा केल्यानंतर अजित पवार यांना थकवा जाणवू लागला होता. त्यानंतर ते डॉक्टरांच्या सल्ल्यानं स्वतः क्वारंटाइनमध्ये होते.

अजित पवार सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. त्यानंतर त्यांचा प्रदेश कार्यालयात जनता दरबार होणार होता. मात्र, तो रद्द करण्यात आला होता. त्यानंतर अजित पवार यांची प्रकृती बरी नसल्याचं समोर आलं होतं. मात्र, करोना चाचणी निगेटिव्ह आल्याचंही स्पष्ट करण्यात आलं होतं. मात्र, सोमवारी त्यांना डॉक्टरांच्या सल्ल्यानं रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी