34 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeमनोरंजननिर्माते विजय शिंदेंच्या प्रयत्नाने 'अदिती म्युझिक कंपनी' रसिकांच्या भेटीला

निर्माते विजय शिंदेंच्या प्रयत्नाने ‘अदिती म्युझिक कंपनी’ रसिकांच्या भेटीला

टीम लय भारी

मुंबई : विजय  शिंदेंनी झी समूहासारख्या नामांकित असलेल्या माध्यम कंपनीत २० वर्षांपेक्षा अधिक काळ काम त्यांनी केले. या कामातूनच त्यांनी मनोरंजन क्षेत्रासाठी काहीतरी वेगळं केलं पाहिजे’ या जाणीवेतून शिंदेंनी चित्रपट निर्मितीचे काम हाती घेतले. आपल्याला मिळालेल्या अनुभवांच्या साठवणीतून शिंदेनी अल्पावधीतच एकामागोमाग चार मराठी चित्रपटांची निर्मिती केली आहे (‘Aditi Music Company’ comes to meet the fans).

‘सोयरीक’, ‘पोरगं मजेतय’, नाही वरणभात लोन्चा कोन नाय कोन्चा’, ‘हवाहवाई’ या चार चित्रपटांच्या माध्यमातून शिंदे यांनी मराठी चित्रपटसृष्टीत निर्माता म्हणून यशस्वीपणे पदार्पण केले. असे असतानाच शिंदे यांनी आता ‘अदिती म्युझिक कंपनी’ याची निर्मिती केली आहे.

आर्यन खानसह आठ जणांच्या जामीनावर आज फैसला!

Indian Army Job 2021: भारतीय लष्करात भरती; जाणून घ्या संपूर्ण माहिती

महाराष्ट्राच्या प्रत्येक रसिक प्रेक्षकांसाठी दर्जेदार आणि उत्तोमत्तम संगीत कलाकृतींची निर्मिती देण्याच्या उद्देशाने विजय शिंदे यांनी अदिती म्युझिक कंपनीची मुहूर्तमेढ रोवली आहे. देवीच्या घटस्थापनेच्या मुहूर्तावर ए. एम. म्युझिक कंपनीच्या लोगोचे अनावरण करण्यात आले.

'Aditi Music Company' comes to meet the fans
घटस्थापनेच्या मुहूर्तावर ए. एम. म्युझिक कंपनीच्या लोगोचे अनावरण

हृतिक रोशन याने लिहिली आर्यन खानसाठी खास पोस्ट

Tiger Shroff’s latest stunt video is inspired by THIS Marvel superhero’s game; See Krishna’s reaction to it

'Aditi Music Company' comes to meet the fans
‘अदिती म्युझिक कंपनी’ चे निर्माते विजय शिंदे

गुणी व प्रतिभावान कलाकारांना संधी मिळावी यासाठी आमची म्युझिक कंपनी प्रयत्नशील असेल असे ‘अदिती म्युझिक कंपनी’ चे निर्माते शिंदे यांनी सांगितले. तसेच होतकरू कलाकारांचे उत्तमोत्तम अल्बम श्रोत्यांसमोर आणणे हेच आमचे उद्दिष्ट आहे. मराठी भाषेसोबत इतर प्रादेशिक गीतांनासुद्धा स्थान देण्यात येणार आहे. भक्तीगीते, शास्त्रीय, वाद्यसंगीत, गझल आदी अनेक प्रकारचे हे अल्बम असतील.’‘अदिती म्युझिक’ कंपनीतर्फे लोकसंगीत, जागर, भक्तीसंगीत, लावणी, गझल यांसारख्या वैविध्यपूर्ण गीत-संगीताची मेजवानी आगामी काळात रसिकांना मिळणार आहे.

निर्माते विजय शिंदेंच्या प्रयत्नाने 'अदिती म्युझिक कंपनी' रसिकांच्या भेटीला

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी