31 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeआरोग्यअजितदादा कॉरन्टाईन, पण कामाचा धडाका सुरूच

अजितदादा कॉरन्टाईन, पण कामाचा धडाका सुरूच

टीम लय भारी

मुंबई : उपमुख्यमंत्री अजितदादा पवार सध्या ‘होम कॉरन्टाईन’ आहेत ( Ajit Pawar at home quarantine ). तरीही त्यांच्या कामाचा धडाका मात्र थांबलेला नाही. घरातूनच ते जनतेची कामे मार्गी लावत आहेत.

राज्यात पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्याबाबत सरकारकडून शेतकऱ्यांना आर्थिक मदत केली जात आहे. वित्त मंत्री या नात्याने अजित पवार यांची या मदतकार्यात महत्वाची भूमिका आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे विषय प्रलंबित राहू नयेत म्हणून अजितदादा ‘कॉरन्टाईन’ असूनही काळजी घेत आहेत ( Ajit Pawar working from home ).

हे सुद्धा वाचा

खरे व्हिलन कोण ? खडसे की, फडणवीस ??

चंद्रकांत पाटील म्हणाले, अजित पवार आम्ही तुमचे बाप आहोत

अजित पवारांनी ‘या’ कारणासाठी डॉ. राजेश देशमुख यांची पुणे जिल्हाधिकारी पदावर केली नियुक्ती

शेतकऱ्यांबरोबरच इतर महत्वाच्या विषयांच्या फायलींचाही ते निपटारा करीत आहेत. व्हिडीओ कॉन्फरन्स व दूरध्वनीद्वारे अजितदादा अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत ( Ajit Pawar is in contact with officers ). फायलींवर निर्णय घेणे तसेच कामे थांबणार नाहीत याबाबत ते अधिकाऱ्यांशी चर्चा करीत आहेत. अजितदादांच्या कार्यालयातूनच ही माहिती देण्यात आली आहे.

दोन दिवसांपूर्वी अजितदादांना हलका ताप जाणवत होता. अंगदुखीही होती. त्यामुळे अजितदादांनी ‘कोरोना’ची चाचणी करून घेतली. सुदैवाने त्यांची चाचणी निगेटीव्ह आली आहे.

तरीही खबरदारीचा उपाय म्हणून अजितदादा घरीच ‘कॉरन्टाईन’ झाले आहेत. त्यांच्या ‘देवगिरी’ या सरकारी बंगल्यातून ते काम करीत असल्याची माहिती त्यांच्या कार्यालयाने दिली आहे.

Mahavikas Aghadi

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी