29 C
Mumbai
Wednesday, May 1, 2024
HomeमुंबईLand Scam : मुख्यमंत्र्यांकडून ३ हजार कोटी रुपयांचा जमीन घोटाळा : सोमय्या

Land Scam : मुख्यमंत्र्यांकडून ३ हजार कोटी रुपयांचा जमीन घोटाळा : सोमय्या

टीम लय भारी

मुंबई : भांडुप येथे कोविड सेंटर येथील जमीन ही महाराष्ट्र सरकारची आहे. ती एका व्यक्तीला साठ वषार्साठी भाड्याने दिली होती. पण २२ एकर जमीन महाराष्ट्र सरकारने महापालिकेला कोविड सेंटर उभारण्यासाठी ओळखीचा बिल्डरच्या साह्याने ३ हजार करोड रुपयाला भाडेतत्त्वावर घेतली. त्यामधून मुख्यमंत्र्यांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप (Land Scam) भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषदेत केला.

मुंबई महापालिकेने ५ हजार खाटांचे रुग्णालय उभारण्यासाठी खाजगी जागा हवी आहे, अशी जाहिरात दिली. 23 ऑगस्ट 2020 ला 2 कंपन्यांनी प्रस्ताव सादर केले होते. त्याबाबत बोलताना भाजपचे नेते किरीट सोमैया म्हणाले, की दिलीप शहा यांचा प्रस्ताव बोगस होता. कारण ती त्यांच्या मालकीची जागा नव्हती.

महापालिका व जिल्हाधिका-यांनी दिलेल्या माहिती अधिकारानुसार, भांडुपच्या जागेचा प्रस्ताव तांत्रिकदृष्ट्या योग्य नाही. तरीही भांडुपचा प्रस्ताव निवडला. हे कागदोपत्री दाखविण्यासाठी हा खेळ केला गेला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या साह्याने हा भ्रष्टाचार झाल्याचा किरीट सोमैया यांनी आरोप केला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी