31 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
HomeमुंबईFake News : जितेंद्र आव्हाडांच्या मुलीबाबत अपप्रचार, इंग्रजी वृत्तवाहिनीच्या दोन पत्रकारांवर कारवाई

Fake News : जितेंद्र आव्हाडांच्या मुलीबाबत अपप्रचार, इंग्रजी वृत्तवाहिनीच्या दोन पत्रकारांवर कारवाई

टीम लय भारी

मुंबई : ‘कोरोना’बाधित रूग्णांची नावे उघड करू नये असे सरकारी निर्देश आहेत. तरीही एका इंग्रजी वृत्तावाहिनीने गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या मुलीला ‘कोरोना’ लागण झाल्याची बातमी ( Fake News ) प्रसारित केली. त्यामुळे या वृत्तवाहिनीची बातमीदार व अँकरवर कारवाई करण्याचे आदेश गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले आहेत. देशमुख यांनीच या कारवाईची माहिती ट्विटरवरून दिली आहे.

Coronavirus

‘जितेंद्र आव्हाड यांची मुलगी स्पेनवरून येताना ‘कोरोना पॉझिटिव्ह’ असल्याचा धादांत खोटा व चुकीचा दावा ( Fake News )  चॅनेलने केला. यामुळे ‘कोरोना’ रुग्णाचे नाव जाहीर न करण्याच्या आचारसंहितेची पायमल्ली झाली. कायद्यानुसार मुलींचं नाव जाहीर न करण्याचे नियम आहेत. या वृत्तवाहिनीने बेछूट व हेतूपुरस्सर ( Fake News )  जे केलं ते अत्यंत गंभीर आहे. देशभरात कोरोना संसर्गामुळे भितीचं वातावरण असताना घबराट पसरविणाऱ्या व खोट्या बातम्या ( Fake News )  दाखवणं चुकीचे आहे. त्यामुळे या वृत्तवाहिनीच्या वार्ताहर व निवेदक यांच्यावर नियमानुसार कारवाईचे आदेश दिले आहेत’ अशा आशयाचे ट्विट देशमुख यांनी केले आहे.

चुकीची बातमी दिल्याप्रकरणी बुधवारी मराठी वाहिनीच्या एका वरिष्ठ पत्रकाराला पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर आता इंग्रजी वृत्तवाहिनीच्या दोन पत्रकारांवरही गृह विभागाने पोलीस कारवाई प्रस्तावित केली आहे. त्यामुळे संवेदनशील काळामध्ये असंवेदनशील पत्रकारांचीही गय केली जाणार नसल्याचा इशाराच एक प्रकारे सरकारने दिला असल्याचे बोलले जात आहे.

या इंग्रजी वाहिनीने जितेंद्र आव्हाड व त्यांच्या मुलीशी ‘कोरोना’शी संबंध जोडून बातमी ( Fake News )  दिली. त्यामुळे जितेंद्र आव्हाड सुद्धा कमालीचे व्यथित झाले होते. त्यांनी बुधवारी सोशल मीडियावर अत्यंत भावनिक लेख लिहून आपल्या मनातील दुःख व्यक्त केले होते ( जितेंद्र आव्हाड यांनी लिहिलेला हा लेख जसाच्या तसा वाचण्यासाठी येथे क्लिक करा ).

विनय दुबेला ओळखत नसल्याचे स्पष्टीकरण

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी संबंध जोडणारी ( Fake News )  बातमीसुद्धा या वृत्तवाहिनीने दिली होती. वांद्रे येथे गर्दी जमविल्याप्रकरणी पोलिसांनी विनय दुबे याला बुधवारी अटक केली आहे. या पार्श्वभूमीवर देशमुख यांनी ट्विटद्वारे स्पष्टीकरण दिले आहे.

मुख्यमंत्री सहायता निधीसाठी 25 हजार रुपयांचा धनादेश देण्यासाठी एक रिक्षावाला मंत्रालयात आला होता. पण मुख्यमंत्री मंत्रालयात नसल्यामुळे या रिक्षावाल्याने तो धनादेश माझ्याकडे दिला. या रिक्षावाल्यासोबत बहुधा विनय दुबे होता. मी विनय दुबे याला ओळखत नाही असे ट्विट देशमुख यांनी केले आहे.

रेल्वे सुरू होणार असल्याबाबत 11 प्रकारचे संदेश झाले होते व्हायरल

रेल्वे गाड्या 14 एप्रिलपासून नेहमीप्रमाणे धावतील अशा आशयाचे 11 प्रकारचे मेसेज वेगवेगळ्या माध्यमांतून परविण्यात आल्याचे समोर आली आहे. माहिती पसरविणाऱ्यांच्या अकाऊंट्सचा तपशिलसुद्धा पोलिसांच्या हाती लागला आहे. त्या संदर्भात आता लवकरच कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे ट्विट गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले आहे.

आणखी बातम्या वाचण्यासाठी आमचे ट्विटर अकाऊंट फॉलो करा

हे सुद्धा वाचा

FightWithCovid19 : जितेंद्र आव्हाडांचा भावनिक संदेश, मी गोरगरीबांसाठी झटलो… हा गुन्हा केलाय का ?

Lockdown2 : चुकीची बातमी देणाऱ्या पत्रकाराला अटक, आणखी काही पत्रकार रडारवर

Lockdown2 : मजुरांसाठी रेल्वे सुटणार असल्याच्या चुकीच्या ‘बातमी’ने वांद्रे स्थानकात उसळली गर्दी

‘रिपब्लीक भारत’ने जिवंत व्यक्तीला मृत ठरवून दिली बातमी

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी