33 C
Mumbai
Sunday, April 28, 2024
Homeमहाराष्ट्रजितेंद्र आव्हाड आभार मानण्यासाठी पोहचले मंत्रालयात

जितेंद्र आव्हाड आभार मानण्यासाठी पोहचले मंत्रालयात

टीम लय भारी

मुंबईःनिर्णय वेगवान….खाते गृहनिर्माण… हे गृहनिर्माण विभागाचे ब्रिदवाक्य घेवून, जितेंद्र आव्हाड यांनी हे खाते सांभाळले. हे खाते सांभाळत असतांना त्यांना सचिव, कर्मचारी देखील चांगले लाभले. त्यांनी कामाला न्याय दिला. तत्परता दाखवली. त्या सर्वांचे आभार मानण्यासाठी आज गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड मंत्रालयामध्ये गेले होते.

त्यांनी गृहनिर्माण विभागातील सचिव, अधिकारी व कर्मचारयांचे आभार मानले.गृहविभागातील सचिव तसेच अधिकारी वर्ग कामात तत्पर होता. ते 48 तासांच्या आता जीआर काढायचे. एकटया बीडीडी चाळीचे 50 हून अधिक जीआर निघाले, जे लोकांच्या फायदयाचे ठरले. काम करण्यासाठी आधिकारी वर्ग मेहन घेत होता. गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर, उपसचिव अजित कवडे, उपसचिव सुनिल तुंबारे तसेच त्यांच्या सोबतचे सर्व कर्मचारी यांच्या कामामुळेच गृहनिर्माण विभागाने वेग पकडला. त्यामुळे जितेंद्र आव्हाड यांनी गृहनिर्माण विभागातील सर्वांचे आभार मानले.

हे सुध्दा वाचा:

नितीन गडकरी यांना ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ पदवी देऊन सन्मान

एकनाथ शिंदेंनी बायको, सुन, नातवंडाला मंत्रालयात नेले, अन् काम सुरू केले !

सरकारने ‘स्थगिती सरकार’ अशी प्रतिमा बनवू नये -अशोक चव्हाण

 

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी