34 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeमंत्रालयAnil Deshmukh : महाराष्ट्रातील १७ हजार कैद्यांना मुक्त करण्याचा निर्णय

Anil Deshmukh : महाराष्ट्रातील १७ हजार कैद्यांना मुक्त करण्याचा निर्णय

टीम लय भारी

मुंबई : ‘कोरोना’ने आता तुरुंगातही घुसखोरी केली आहे. त्यामुळे राज्यभरातील निम्म्या कैद्यांना घरी सोडण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. गृहमंत्री अनिल देशमुख  ( Anil Deshmukh ) यांनी ही माहिती दिली.

ऑर्थर रोड तुरूंगात तब्बल १२५ कैद्यांना ‘कोरोना’ची ( Corona ) लागण  झाली आहे. अन्य कैद्यांनाही अशा प्रकारे ‘कोरोना’ची ( Corona ) लागण होऊ नये म्हणून त्यांना मुक्त करण्याचा निर्णय घेतल्याचे देशमुख ( Anil Deshmukh ) यांनी सांगितले.

देशमुख म्हणाले की, अंडर ट्रायल असलेल्या ५ हजार कैद्यांना अगोदरच सोडण्यात आले आहे. ७ वर्षांपर्यंत शिक्षा तीन हजार कैदी व ७ वर्षांपेक्षा जास्त शिक्षा झालेले ९ हजार कैदी, अशा एकूण १७ हजार कैद्यांना तात्पुरत्या स्वरूपात मुक्त करण्यात येत असल्याचे ते म्हणाले.

बलात्कार, मोठे आर्थिक घोटाळे, बँक घोटाळे, मोक्का, टाडा असे गंभीर गुन्हे असलेल्या कैद्यांना मात्र सोडण्यात येणार नसल्याचे ते ( Anil Deshmukh ) म्हणाले. राज्यातील प्रमुख आठ कारागृहांना लॉकडाऊन केले आहे. तिथे आता कुणीही आत येणार नाही, बाहेरही कुणी जाणार नाही, असाही निर्णय घेतल्याचे ते ( Anil Deshmukh ) म्हणाले.

हे सुद्धा वाचा

भाजपला धक्का : ‘या’ मंत्र्याची आमदारकी गेली

MLC election- शेकडो स्पर्धक असताना राठोड यांनाच संधी मिळण्याची ही आहेत कारणे…

Devendra Fadanvis : फडणवीसजी, आपण इतके कसे महाराष्ट्रद्वेषी ?

Maharashtra Minister Changes Social Media Profile Pictures As Tribute To Cops

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी