35 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeराजकीयअनिल देशमुखांना सर्वात मोठा झटका, कोर्टाने जामीन अर्ज फेटाळला

अनिल देशमुखांना सर्वात मोठा झटका, कोर्टाने जामीन अर्ज फेटाळला

टीम लय भारी

मुंबई: राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख  यांच्यामागील संकटं काही कमी होताना दिसत नाहीय. गेल्या दोन महिन्यांपासून अटकेत असलेल्या देशमुखांना एकामागेएक झटके मिळताना दिसत आहेत. अनिल देशमुख यांच्या वकिलांकडून त्यांच्या जामीनासाठी भरपूर प्रयत्न करण्यात आले. पण देशमुखांना जामीन मिळणं कठीण होऊन बसलं आहे. विशेष म्हणजे मुंबई सत्र न्यायालयाने  आज अखेर अनिल देशमुख यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे.( Anil Deshmukh’s biggest blow Court rejects bail)

देशमुख आणि राज्य सरकारला हा सर्वात मोठा झटका आहे. अनिल देशमुख यांचा जामीन अर्ज फेटळण्याबाबतचा निर्णय विशेष पीएमएलए कोर्टाने आज दिला. ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्रानंतर अनिल देशमुख यांनी जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. सध्या देशमुख आर्थर रोड जेलमध्ये न्यायालयीन कोठडीत आहेत.

2 नोव्हेंबर रोजी अनिल देशमुखांना अटक
100 कोटी वसुली आणि मनी लाँड्रिंग प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री (Former Home Minister) अनिल देशमुख (Anil Deshmukh arrest) यांना ईडीने अटक केली. 12 तासांच्या चौकशीनंतर ईडीने अटकेची कारवाई केली होती. या कारवाईमुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली होती.

हे सुद्धा वाचा

अनिल देशमुखांनी बार मालकांकडून हफ्ता गोळा करायला सांगितला नाही, एसीपी संजय पाटील यांचा खुलासा

काँगेस नेते नाना पटोलेंना अटक करा, नितीन गडकरींची मागणी

अनिल देशमुखांनी सांगितलं चौकशीला न येण्याचं कारण

Maharashtra: Anil Deshmukh’s default bail plea rejected in money laundering case

100 कोटी वसुलीप्रकरणी (Money laundering case) आरोप असलेले अनिल देशमुख अनेक दिवसांपासून गायब होते. अनिल देशमुख यांना 5 वेळा समन्स बजावल्यानंतरही ईडीसमोर हजर राहिले नव्हते. त्यामुळे त्यांना त्यांच्या नावानं लूक आऊट सर्क्युलर जारी करण्यात आलं होतं. तसंच देशमुख यांचा शोध घेण्यासाठी ईडीकडून सीबीआयकडे मदत मागण्यात आली होती. अखेर 1 नोव्हेबर रोजी अनिल देशमुख ईडी कार्यालयात हजर झाले. सकाळी 11 वाजेच्या सुमारास अनिल देशमुख ईडी कार्यालयात पोहोचले होते. त्यानंतर जवळपास 12 तासांच्या चौकशीनंतर अनिल देशमुख यांना ईडीने अटक केली होती.

अनिल देशमुख यांच्याविरोधात 7 हजार पानी आरोपपत्र

अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांप्रकरणी ईडीचा काही दिवसांपूर्वीच तपास पूर्ण झाला होता. ईडीकडून जवळपास 7 हजार पानी आरोपपत्र दाखल करण्यात आलं होतं. या आरोपपत्रात अनिल देशमुख हे मुख्य आरोपी असल्याचा उल्लेख करण्यात आला होता. तर सह आरोपी म्हणून अनिल देशमुख यांचे सचिव संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे यांना दाखवले गेले होते. या आरोपपत्रात अनिल देशमुख यांचा मुलगा ऋषिकेश देशमुख याला ईडीने फरार घोषित केले आहे. या प्रकरणात एकूण 3 जणांना ईडीने फरार घोषित केले आहे. वारंवार समन्स देवून देखील अनिल देशमुख यांचा मुलगा ऋषिकेश देशमुख हा चौकशीला हजर राहिला नाही मात्र याप्रकरणी अटकेपासून आपल्याला संरक्षण मिळावे या करता ऋषिकेश देशमुख याने न्यायालयात धाव घेतली होती. पण याप्रकरणी अजूनही न्यायालयीन प्रक्रिया सुरूच आहे.

नेमकं प्रकरण काय?
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे याच्याकडून 100 कोटींची वसुली केल्याचा आरोप केला होता. या प्रकरणी ईडीने तपास करत अनिल देशमुख यांच्या घर आणि कार्यालयावर छापे टाकले होते. ईडीच्या अटकेची कारवाई टाळण्यासाठी देशमुख यांनी मुंबई हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. पण, कोर्टाने त्यांची याचिका फेटाळून लावली होती. अखेर अनिल देशमुख ईडी कार्यालयात हजर झाले आणि चौकशीअंती अटकेची कारवाई झाली.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी