30 C
Mumbai
Sunday, April 28, 2024
Homeराजकीयकाँगेस नेते नाना पटोलेंना अटक करा, नितीन गडकरींची मागणी

काँगेस नेते नाना पटोलेंना अटक करा, नितीन गडकरींची मागणी

टीम लय भारी

नागपूर:- काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानानंतर भाजप नेत्यांकडून त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही नाना पटोले यांच्यावर निशाणा साधला आहे. नितीन गडकरी यांनी ट्विट करून यासंदर्भात आपली प्रतिक्रिया दिली आहे.( Congress leader Nana Patole Arrest  Demand , Nitin Gadkari)

पंतप्रधान मोदी यांच्यावरील वक्तव्याने नाना पटोले वादात घेरले गेले आहेत. जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारसभेदरम्यान काँग्रेस नेते नाना पटोले यांनी  मोदी यांच्याबाबत वादग्रस्त  वक्तव्य केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. भाजपचे खासदार सुनील मेंढे यांनी सोमवारी संध्याकाळी भंडारा पोलीस ठाण्यात पटोले यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली.

पोलिसांनी तक्रारीची नोंद घेतली असून, अधिक तपास करुन पुढील कार्यवाही करणार असल्याचे सांगितले.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी महाराष्ट्र कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी वापरलेली भाषा अतिशय आक्षेपार्ह व निंदनीय आहे. माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे, की पटोलेंवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी, असे ट्विट गडकरी यांनी केले आहे.

हे सुद्धा वाचा

नितीन गडकरींनी सांगितली त्यांच्या काळातील पुण्याची आठवण

नितीन गडकरींनी जाहीर कार्यक्रमात अनिल देशमुखांचे मानले आभार; कारण…

शरद पवारांनी केले नितीन गडकरींचे तोंडभरून कौतुक

Prof N.D. Patil, Veteran PWP Leader And Sharad Pawar’s Kin, Dies At 93

“मी का भांडतो? गेल्या ३० वर्षापासून मी राजकारणात आहे. लोकं 5 वर्षांत आपल्या एका पिढीचा उद्धार करतात. शाळा, कॉलेज करुन आपल्या एक-दोन पिढीचा उद्धार करुन टाकतात. मी एवढी वर्षं झाली राजकारण करतोय. पण एक शाळा माझ्या नावावर नाही. इथून पाठीमागे एक ठेकेदारी नाही केली. जो आला त्याला कायम मदत करतोय. म्हणून मी मोदी यांना मारु शकतो, त्यांना शिव्या देऊ शकतो आणि म्हणून मोदी माझ्या विरोधात प्रचाराला आले. एक प्रामाणिक नेतृत्व तुमच्या समोर उभे आहे….” दरम्यान, प्रचारसभेदरम्यान आपण पंतप्रधान मोदी यांच्याबद्दल बोललो नाही, तर मोदी नावाच्या एका गावगुंडाबाबत बोललो, असे स्पष्टीकरण नाना पटोले यांनी दिलेय.

नाना पटोले यांच्यावर फडणवीस यांनी निशाणा साधला होता. काँग्रेस पक्षाचे चालले तरी काय? स्वातंत्र्याच्या आंदोलनात असणारा हा पक्ष इतक्या रसातळाला? सत्तेसाठी काहीही? काँग्रेसला आता लोकशाहीतील राजकीय पक्ष म्हणायचे, की दहशत पसरविणारे संघटन? नानाभाऊ केवळ शारीरिक उंची असून चालत नाही, वैचारिक-बौद्धिक उंची पण असावी लागते!’ असं ट्वीट फडणवीस यांनी करत, पटोले यांच्यावर शाब्दिक हल्ला चढवला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी