33 C
Mumbai
Sunday, May 5, 2024
Homeराजकीयभाजप आमदार कोरोना पॉझिटिव्ह असतानाही आंदोलनस्थळी उपस्थित

भाजप आमदार कोरोना पॉझिटिव्ह असतानाही आंदोलनस्थळी उपस्थित

टीम लय भारी
नागपूर:-  आज भाजप आमदार कृष्णा खोपडे हे कोरोना पॉझिटिव्ह असतानाही आंदोलनसाठी उपस्थित होते. नागपूरमध्ये चंद्रशेखर बानकुळे  यांच्या नेतृत्वात आंदोलन सुरु होते. नाना पटोले यांच्यावर गुन्हा दाखल करून अटकेची मागणी करण्यासाठी नागपूर भाजपच्यावतीने आंदोलन सुरु होते. पाच दिवसांपूर्वी खोपडे कोरोना  पॉझिटिव्ह आले होते. पॉझिटिव्ह असताना आंदोलन करणे म्हणजे स्वत:सोबत इतरांचाही जिव धोक्यात घालण्यासारखे आहे.( उपस्थित  BJP MLA Corona present agitation site despite being positive)

आमदार कृष्णा खोपडे हे 13 जानेवारीला कोरोना पॉझिटिव्ह आले होते. त्यांनी स्वतः ट्विट करत 13 जानेवारीला ही माहिती दिली होती. त्यानंतर अवघ्या पाचच दिवसात आज ते सुमारे शंभर कार्यकर्त्यांसह लकडगंज पोलीस स्टेशन मध्ये पोहोचले.

हे सुद्धा वाचा

टेलिप्रॉम्टर अचानक बंद पडल्याने पंतप्रधान मोदींचा उडाला गोंधळ

Corona Updates : केंद्राचे घुमजाव! १२ ते १४ वयोगटातील मुलांना लस देण्याचा कोणताही कार्यक्रम अद्याप ठरलेला नाही

नया नया पंछी है, वडेट्टीवारांचा पडळकरांवर हल्लाबोल

News Highlights: Rahul Gandhi expected to return to India in second week of January

आमदारांना कोरोना नियमांचा विसर पडलेला आपल्याला पाहायला मिळाला. भाजपचे अनेक पदाधिकारी आंदोलनात सहभागी झाले होते. इतरांनाही कोरोनाची लागण होण्याची शक्यता आता वर्तवण्यात येत आहे. आरोग्य अधिकाऱ्यांसोबत बोलल्यानंतरच आपण घराबाहेर पडल्याचं खोपडे यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

दरम्यान राज्यात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. नागपूरमध्ये  कोरोना रुग्णाची संख्या झपाट्याने वाढत आहे. दुसऱ्या लाटेच्या वेळी आपण पाहिलं होते की नागपूर कोरोनाचा हॉटस्पॉट ठरला होता. सध्या तिसऱ्या लाटेच्या पार्वश्वभुमिवर राज्यात कोरोना निर्बंध लावण्यात आले आहेत. त्याचे पालन करणे हे सर्वसामान्य जनतेपासून लोकप्रतिनिधींना बंधनकारक आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी