31 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeराजकीयआर्यन खानचे ड्रग्ज प्रकरण बनावट, नवाब मलिक यांनी एनसीबीचे पितळ उघडे पाडले

आर्यन खानचे ड्रग्ज प्रकरण बनावट, नवाब मलिक यांनी एनसीबीचे पितळ उघडे पाडले

टीम लय भारी

मुंबई :  अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी मुंबई – गोवा क्रुझवर एकूण ११ जणांना पकडले होते. त्यापैकी तीन जणांना एनसीबीने सोडून दिले आहे. त्यातील ऋषभ सचदेव हा भाजप नेत्याचा पाहुणा असल्याचा घणाघाती आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे (Aryan Khan drug case fake, Nawab Malik exposes NCB).

प्रतिक गावा आणि आमिर फर्निचरवाला ही अन्य दोघांची नावे आहेत. एनसीबीने एकूण ११ जणांना अटक केली होती. मुंबई पोलिसांनाही ११ लोकांची माहिती दिली होती. नंतर आठ लोकांवर गुन्हा दाखल केला. क्रुझवरून ११ लोकांना आणण्यात आले, पण तीन जणांना सोडण्यात आले. या तीन जणांना त्यांच्या घरातील लोक एनसीबीच्या कार्यालयातून घेऊन जात असल्याचे त्यात दिसत आहे, असे मलिक यांनी सांगितले. एवढेच नव्हे तर पत्रकार परिषदेनंतर त्यांनी पत्रकारांना व्हिडीओसुद्धा दिले.

एनसीबीची चित्रपट निर्माते इम्तियाज खत्रींच्या घरावर, कार्यालयावर छापेमारी!

भाजपचे कार्यकर्ते, प्रवक्ते आणि भक्त सर्वत्रच आहेत, फक्त ते कश्मीर खोऱ्यात नाहीत; शिवसेनेचा टोला

एनसीबीने १३०० लोकांचा शोध घेऊन ११ लोकांना ताब्यात घेतले होते. मग तीन लोकांना का सोडले. ज्याला सोडले तो ऋषभ सचदेव हा भाजपचा नेता मोहित भारतीय यांचा मेहुणा आहे. गाभा व फर्निचरवाला यांचे तर न्यायालयीन प्रक्रियेतील कागदपत्रांमध्येही नाव आले आहे. असे असताना त्यांना सोडून का दिले, असा सवाल मलिक यांनी केला.

कुणाच्या बोलण्यावरून या लोकांना सोडण्यात आले. या तीन जणांचे फोन का ताब्यात घेतले नाहीत, असेही प्रश्न मलिक यांनी उपस्थित केले आहेत.

भाजपच्या नेत्यांच्या सांगण्यावरूनच सोडण्यात आले आहे. भाजपने रचलेला हा मोठा बनाव आहे. महाराष्ट्र सरकारला बदनाम करणे, मुंबई बदनाम करणे, बॉलिवूडला बदनाम करणे या हेतूने भाजपने एनसीबीच्या माध्यमातून मोठे कटकारस्थान रचल्याचे मलिक यांनी घणाघात केला.

अजित पवारांसह बहिणींच्या कार्यालयांवर सलग तिसऱ्या दिवशीही आयकरची छापेमारी

Shah Rukh Khan Is Neither Eating Nor Sleeping Much After Aryan Khan’s Arrest Claims Reports

मलिक म्हणाले की, मी दिलेल्या माहितीवर चौकशीवर आयोग नेमा. एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांनी चुकीचं काम केलं आहे. असे असताना प्रवीण दरेकर मला एनसीबीच्या समोर जायला सांगतात. ज्यांनी चुकीचे केले त्यांच्यासमोर जायला सांगणे योग्य नाही, असेही ते म्हणाले.

एनसीबीने ११ जणांना आणले होते. त्यापैकी आठ जणांचेच जवाब घेतले गेले. भाजपच्या लोकांच्या दबावावरून ३ लोकांना सोडले. दरेकर म्हणत आहेत की, एनसीबीच्या समोर जा. पण आम्ही जनतेच्या कोर्टात जात आहोत. जनतेच्या समोर सगळे आणतोय. जनतेच्या कोर्टापेक्षा दुसरे मोठे कोर्ट नाही.

आर्यन खानचे ड्रग्ज प्रकरण बनावट, नवाब मलिक यांनी एनसीबीचे पितळ उघडे पाडले

ज्या तिघांनी आर्यन खानला क्रुझवर आणले होते, त्यांनाच एनसीबीने सोडून दिले आहे. भाजपने रचलेला हा बनाव होता, असेही मलिक म्हणाले.

अटकेनंतरच्या पंचनाम्यावर गोसावी व मनिष भानुशाली साक्षीदार नमूद केले आहे. पंचनामा हा जाग्यावरच व्हायला हवा होता. पण तो एनसीबीच्या कार्यालयात केला गेला. त्यात पत्ते वेगळे आहेत. दोन वेगवेगळे पंचनामे केले आहेत, असेही नवाब मलिक म्हणाले.

‘ज्या लोकांनी आर्यन खानला बोलवलं होत त्याच लोकांना NCB ने सोडले’

नवाब मालिकांनी पत्रकार परिषदेत मोठा गोप्यस्फोट केला आहे. आमिर फर्निचरवाला, रुषब सचदेवा, प्रतिक गावा या तीन लोकांना एनसीबीने सोडले असल्याचे मलिक म्हणाले. याच तिघांनी आर्यन खानला बोलावले होते आणि याच लोकांना एनसीबीने सोडले. तसेच राज्य सरकार आणि बॉलीवूडला बदनाम करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे असे ही मलिक यावेळी म्हणाले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी