34 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeमहाराष्ट्रपोलिस अधिकाऱ्यांच्या बदलीत राजकारणाची खेळी, पदासाठी ‘ती’ बनावट ऑडिओ क्लिप

पोलिस अधिकाऱ्यांच्या बदलीत राजकारणाची खेळी, पदासाठी ‘ती’ बनावट ऑडिओ क्लिप

टीम लय भारी

पुणे :- पुणे जिल्ह्यात झोन वन येथे वरिष्ठ पोलीस अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या डी. सी. पी. प्रियांका नारनवरे यांची एक दमदाटीची ऑडियो क्लिप व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेल्या ऑडियो क्लिपमध्ये एक महिला अधिकारी दमदाटी वजा आज्ञा देताना ऐकायला मिळत आहे (In the audio clip, a female officer is heard shouting).

पण, खात्रीदायक सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार व्हायरल होणाऱ्या ऑडिओ क्लिपमधील आवाज हा डी. सी. पी. प्रियांका नारनवरे यांचा नसून तो बनावट ऑडियो आहे. संबंधित अधिकाऱ्याची बदली करण्यासाठी ही बनावट ऑडियो क्लिप व्हायरल केली जात असून त्यांच्याविरोधात राजकारण व षडयंत्र रचले जात असल्याची माहिती मिळत आहे.

रेश्मा (मनुताई) देशमुख कबड्डी क्रिडा मंडळ आणि कोल्ड कट्टा बॉईज पूरग्रस्तांच्या मदतीला

‘भास्कर जाधव; तुला मंत्री बनवत नाहीत, म्हणून तू भूंकत राहिलायस’

त्यांच्या पदावर येऊ इच्छणाऱ्या अन्य अधिकाऱ्याने बनावट ऑडियो क्लिप तयार करून व्हायरल केल्याचा संशय आता व्यक्त केला जात आहे. आता या प्रकरणाची चौकशी सायबर सेलकडून व्हावी अशी मागणी केली जात आहे (It is now being demanded that the matter be investigated by the Cyber Cell).

Audio clip a female officer is heard shouting
ऑडिओ क्लिप व्हायरल

माजी शाखा व्यवस्थापकाचा बँकेवर सशस्त्र दरोडा. एका महिलेचा मृत्यू

Pune police: Trio held on charge of bid to steal cash from ATM

पुण्यातून अनेक कर्तव्यदक्ष अधिकारी आपल्या कामाशी तत्पर असल्याचे आपण पाहिले आहे. डीसीपी प्रियांका नारनवरे या देखील कर्तव्यदक्ष महिला अधिकारी म्हणून ओळखल्या जातात. मात्र आता अधिकाऱ्यांविरुद्ध असे षडयंत्र होत असेल तर याचा न्याय कुठे होणार? आणि अधिकारी अश्या षडयंत्राला बळी पडत असतील ते सामान्य नागरिकांचे काय हाल होणार, ही विचार करण्याची बाब आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी