35 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeराजकीयपंकजा मुंडे यांना मोठा धक्का : या विभागाने केली कारखान्यावर मोठी कारवाई

पंकजा मुंडे यांना मोठा धक्का : या विभागाने केली कारखान्यावर मोठी कारवाई

टीम लय भारी

औरंगाबाद :- भाजपच्या राष्ट्रीय सचिव तथा माजी मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या पाठीमागे साडेसातीचा फेरा सुरू झाला की काय असेच आता एका प्रकरणावरून दिसू लागले आहे. पंकजाताई चेअरमन असलेल्या परळी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचे बँक खाते ईपीएफओ विभागाने सील करण्याची कारवाई केली आहे. पीएफच्या थकबाकीपोटी 92 लाख रुपये वसूल करण्यात आले आहेत. ईपीएफओ औरंगाबाद कार्यालयाने पंकजा मुंडे यांना मोठा दणका देत ही कारवाई केली आहे (The EPFO Aurangabad office has taken this action by slapping Pankaja Munde).

भविष्य निर्वाह निधी थकबाकीदारांविरुद्धची या वर्षातील ही सर्वात मोठी कारवाई आहे. पंकजा मुंडे चेअरमन असलेल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना गेल्या काही वर्षांपासून अडचणीत आहे. पगार न मिळाल्यामुळे कारखान्यातील 700 कामगारांनी मागील मार्च महिन्यात बंद पुकारला होता. मागच्या विधानसभा निवडणुकीपूर्वीही कर्मचाऱ्यांनी थकीत पगारासाठी अनेक दिवस आंदोलन केले होते. मात्र, त्यांना न्याय मिळत नव्हता.

पंकजांचं भाषण ऐकण्याचा प्रश्न नाही; फडणवीसांची पंकजा मुंडेंच्या वक्तव्यावर पहिली प्रतिक्रिया

पंकजा मुंडे घेणार नाराज समर्थक आणि पदाधिकाऱ्यांची भेट

वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याने कर्मचारी कामगारांची भविष्य निर्वाह निधीची रक्कम त्यांच्या खात्यात जमा केली नव्हती. कारखान्याच्या (पांगरी, परळी वैजनाथ, जिल्हा बीड) आस्थापनेची मार्च 2018 ते ऑगस्ट 2019 काळासाठीची पीएफची 1 कोटी 46 लाख रुपये थकबाकी होती. थकीत रक्कम वसूल करण्यासाठी सहायक आयुक्त आदित्य तलवा यांच्या आदेशाने प्रवर्तन अधिकारी एस. आर. वानखेडे यांनी ही कारवाई केली. पीएफच्या थकबाकीपोटी 92 लाख रुपये वसूल करण्यात आले आहेत. औरंगाबाद ईपीएफओ कार्यालयाने ही कारवाई केली आहे (The action has been taken by the Aurangabad EPFO office).

Aurangabad office has taken this action Pankaja Munde
पंकजा मुंडे

मुंडे भगिनी पक्षावर नाराज असलेल्या चर्चेला पंकजाताई मुंडे यांनी पूर्णविराम लावला

Explained: How the Pankaja Munde camp unrest could impact BJP, Maharashtra politics

कारखान्याने मार्च 2018 ते ऑगस्ट 2019 या कालावधीतील पीएफचा भरणा केला नव्हता. पीएफपोटी थकीत रक्कम 1 कोटी 46 लाख रुपये आहे. त्यामुळे थकीत रक्कम वसुली सहायक आयुक्त आदित्य तलवारे यांच्या आदेशाने प्रवर्तन अधिकारी वानखेडे यांनी वसुली नोंदवली. उर्वरित रक्कम वसुलीसाठी कार्यवाही सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, सर्व भविष्य निधी थकबाकीदारांनी थकीत भविष्य निधी देयकांचा भरणा त्वरीत करावा, असे आवाहन क्षेत्रीय आयुक्त जगदीश तांबे यांनी केले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी