30 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeराजकीयनाना पटोलेंच्या स्वबळाच्या नाऱ्यावर राष्ट्रवादीचा खोचक टोला

नाना पटोलेंच्या स्वबळाच्या नाऱ्यावर राष्ट्रवादीचा खोचक टोला

टीम लय भारी

मुंबई :- काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले नेहमी स्वबळाचा नारा देत आहेत. मागच्या काळात नाना पटोलेंनी अनेक वक्तव्य केली आहेत. तसेच काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार म्हणाले होते, की लहान माणसावर मी कशाला लक्ष देऊ. आम्ही एच. के. पाटील काय म्हणतात त्याला महत्त्व देतो. कारण त्यांच्या बोलण्यात तथ्य असते, अशा शब्दात राष्ट्रवादी नेते प्रफुल्ल पटेल यांनी नाना पटोलेंना खोचक टोला लगावला आहे (Nana Patole slogan of self-reliance of the NCP).

प्रफुल्ल पटेल यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले एच. के. पाटील हे काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी आहेत. पाटील यांच्या बोलण्याला आम्ही महत्त्व देतो. त्यांच्या बोलण्यात तथ्य असते. कारण एच. के. पाटील थेट हायकमांडचे प्रतिनिधी म्हणून बोलतात, असे म्हणत प्रफुल्ल पटेल यांनी नाना पटोलेंना खोचक टोला लगावला आहे (Praful Patel has slapped Nana Patole).

पंकजा मुंडे यांना मोठा धक्का : या विभागाने केली कारखान्यावर मोठी कारवाई

राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या जेष्ठ अभिनेत्री सुरेखा सीकरी यांचे निधन

काँग्रेसकडून वारंवार स्वबळाची भाषा केली जात आहे. त्यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे?, असे पटेल यांना विचारण्यात आले. त्यावर त्यांनी नाना पटोलेंना टोला लगावला. ज्यांना जे करायचे त्यांनी ते करावे, कुणीच कुणाला बांधून ठेवले नाही, ही आघाडी आहे. ज्या पक्षाला जे करायचे त्यांनी ते करावे. त्यावर आम्ही रोज रोज उत्तरे का द्यावीत?, असा सवाल पटेल यांनी केला.

यानंतर पटेल म्हणाले, एच.के.पाटील, बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण हे तिन्ही नेते शरद पवारांना भेटले. त्यानंतर हे तिन्ही नेते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटले. याचा अर्थ काय? इशारा तुम्हाला माहीतच आहे, असे सूचक विधानही त्यांनी केले.

राष्ट्रपती पदाच्या चर्चेवरून अतुल भातखळकरांचा शरद पवारांना खोचक टोला

Nana Patole at it again: ‘Sharad Pawar is govt’s remote control’

Nana Patole slogan of self-reliance of the NCP
नाना पटोले

शरद पवारांनी स्पष्ट उत्तर दिले आहे

महाविकास आघाडीचे जनक शरद पवार आहेत. त्यांच्या नेतृत्त्वात सरकार आहे, त्यांच्याच नेतृत्त्वात सरकार चाललेय. महाविकास आघाडीला शरद पवारांचे मार्गदर्शन आहे. पुढेही राहीलच. बाकीचे लोक काय बोलतात याला महत्त्व नाही. नाना पटोले रोज बोलतात, त्याचे प्रतिउत्तर काय द्यावे? हे आम्हाला योग्य वाटत नाही, त्याचे सविस्तर उत्तर शरद पवार यांनी दिले आहे. म्हणून त्यावर जास्त भाष्य करणे योग्य नाही. त्यावर रोज खुलासा करायचा हे आम्हाला योग्य वाटत नाही. एच. के. पाटील यांनी विधान केले आहे. त्यामुळे नेमके कुणाच्या बोलण्यावर जावे? कोण काय बोलतो त्यावर दररोज चर्चा करावी हे योग्य वाटत नाही, असे पटेल म्हणाले आहेत.

आमदारांमध्ये कोणीही नाराज नाही

आघाडीत नाराजी असल्यामुळे स्वबळाचे नारे दिले जात आहेत का?, असा सवालही त्यांना करण्यात आला. त्याने काही फरक पडत असेल असे वाटत नाही. हा रोजचा मीडिया इव्हेंट झाला आहे, असे पटेल म्हणाले आहेत. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीच्या आमदारांमध्ये कोणतीही नाराजी नसल्याचे स्पष्ट केले.

शरद पवार कोणालाही भेटू शकतात

राजनीतीकार प्रशांत किशोर यांनी आधी शरद पवार आणि नंतर काँग्रेस नेते राहुल गांधींची भेट घेतली. त्यावरही त्यांनी भाष्य केले. प्रशांत किशोर कन्स्टंट आहेत. त्यामुळे ते कुठेही जाऊ शकतात. ते कुणालाही भेटू शकतात. एका ठरावीक व्यक्तीमुळे राजकारणाची दिशा ठरत नसते, असेही त्यांनी स्पष्ट केले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी