34 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeराजकीयप्रभाकर देशमुख, उत्तमराव जानकरांना आमदारकी द्या; शरद पवारांना चाहत्याकडून रक्ताचे पत्र

प्रभाकर देशमुख, उत्तमराव जानकरांना आमदारकी द्या; शरद पवारांना चाहत्याकडून रक्ताचे पत्र

टीम लय भारी

मुंबई : निवृत्त IAS प्रभाकर देशमुख व धनगर समाजाचे नेते उत्तमराव जानकर यांना विधानपरिषदेची आमदारकी मिळावी यासाठी त्यांच्या चाहत्यांकडून आग्रही मागणी होत आहे. पण एका चाहत्याने चक्क रक्तानेच शरद पवार यांना पत्र लिहिले आहे ( An activist sent a blood letter to Sharad Pawar ).

बाबाराजे हुलगे असे या चाहत्याचे नाव आहे. देशमुख व जानकर या दोघांनीही राष्ट्रवादी काँग्रेसचे निष्ठेने काम केले आहे. म्हणून त्यांना विधानपरिषेदेची उमेदवारी द्यावी. या दोघांच्या रूपाने माण व माळशिरस या दोन्ही मतदारसंघांसाठी हुशार, कौशल्यवान व धडाडीचे नेतृत्व मिळेल, अशी भावना हुलगे यांनी पत्रात व्यक्त केली आहे ( Babaraje Hulge written letter to Sharad Pawar ) .

Babaraje Hulge written letter to Sharad Pawar

Babaraje Hulge written letter to Sharad Pawar
बाबाराजे हुलगे यांनी शरद पवारांना रक्ताने पत्र लिहिले आहे

प्रभाकर देशमुख व उत्तमराव जानकर यांनी गेल्या वर्षी विधानसभेची निवडणूक लढविली होती ( IAS Prabhakar Deshmukh and Uttam Jankar contested assembly election ). दोघांचाही निसटता पराभव झाला होता. प्रभाकर देशमुख यांचा पराभव ३ हजार मतांनी, तर उत्तमराव जानकर यांचा पराभव २५०० मतांनी झाला होता.

हे सुद्धा वाचा

MLC Election : विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीकडून प्रभाकर देशमुख, विकास लवांडे यांना संधी देण्याची मागणी

MLC Appointment: धनगर आमदारांच्या दोन जागा रिक्त, नव्याने कुणाला संधी मिळणार ?

शरद पवारांवर आरोप करण्यासाठी गोपीचंद पडळकर, महादेव जानकर हे फडविणासांनी वापरलेले नेते : उत्तमराव जानकर

प्रभाकर देशमुखांची जिद्द, जनतेच्या स्वप्नातील माण – खटाव घडविण्यासाठी कटिबद्ध असल्याचा दिला संदेश

Coronavirus : दोन निवृत्त आयएएस अधिकाऱ्यांकडून गोरगोरीबांना धान्य वाटप

देशमुख यांनी माण – खटाव ( सातारा) व उत्तमराव जानकर यांनी माळशिरस ( सोलापूर ) मतदारसंघातून लढत दिली होती. भाजपच्या प्रस्थापित उमेदवारांना देशमुख व जानकर यांनी घाम फोडला होता.

माण – खटावमध्ये प्रभाकर देशमुख यांना ८८ हजार ५०० मते मिळाली होती, तर विजयी उमेदवार जयकुमार गोरे यांना ९१ हजार ५०० मते मिळाली होती. माळशिरसमध्ये उत्तमराव जानकर यांना १ लाख १ हजार मते मिळाली होती, तर भाजपच्या राम सातपुते यांना १ लाख ३ हजार मते मिळाली होती.

देशमुख व जानकर यांचा निसटता पराभव झाला. त्याची दखल घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसने विधानपरिषदेवर संधी दिल्यास हे दोन्ही नेते आपल्या मतदारसंघात प्रभाव निर्माण करतील. राष्ट्रवादीच्या हातून निसटलेले हे दोन्ही मतदारसंघ पुन्हा पक्षाकडे आणण्याची धमक या दोघांमध्ये आहे.

देशमुख व जानकर या दोघांनाही विधानपरिषदेची आमदारकी मिळावी यासाठी त्यांच्या हजारो चाहत्यांची मागणी आहे. हुलगे यांनीही याच अनुषंगाने पवार यांना पत्र लिहिले आहे. आपल्या भावनांची पवार यांनी गांभिर्याने दखल घ्यावी म्हणून हुलगे यांनी चक्क रक्तानेच पत्र लिहिले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी