34 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeमहाराष्ट्रकाठी कसरत करणाऱ्या आजींची गृहमंत्री अनिल देशमुखांनी घेतली भेट, एक लाख रुपये...

काठी कसरत करणाऱ्या आजींची गृहमंत्री अनिल देशमुखांनी घेतली भेट, एक लाख रुपये व साडी चोळी देवून केला गौरव

टीम लय भारी

पुणे : काठीच्या आधारे कसरती करून स्वतःचे व कुटुंबियाचे पोट भरणाऱ्या आजीबाईंची शनिवारी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी भेट घेतली (Anil Deshmukh helps Shantabai Pawar). यावेळी देशमुख यांनी आजीबाईंना एक लाख रुपये व साडी चोळी देवून त्यांचा गौरव केला.

सरकारी योजनेतूनही आणखी मदत करण्याचे आश्वासन अनिल देशमुख यांनी यावेळी दिले ( Anil Deshmukh assured to Shantabai Pawar for more helps). शांताबाई पवार असे या आजीबाईंचे नाव आहे. सोशल मीडिया व प्रसार माध्यमांतून कष्टाळू आजीबाईंची परवड समोर आल्यानंतर आज देशमुख यांनी आजीबाईंच्या घरी जावून त्यांची भेट घेतली.

यावेळी आजीबाईंनी देशमुखांसमोर काठीच्या आधारे काही कसरती करून दाखविल्या. ते पाहून गृहमंत्र्यांसह सर्व उपस्थितांनी जोरदार टाळ्या वाजवून आजीबाईंच्या कसरतीचे कौतुक केले.

शांताबाई पवार यांनी कसरतीचे काही प्रकार करुन आपण या वयातही आरोग्‍यसंपन्‍न असल्‍याचे दाखवून दिले.

Anil Deshmukh meets Shantabai Pawar
अनिल देशमुखांना शांतीबाई पवारांना कसरती करून दाखविल्या

पुणे पोलीस आयुक्‍तालयाच्‍या ‘भरोसा सेल’मार्फत ज्‍येष्‍ठ नागरिकांना मदत केली जाते. आतापर्यंत १५ हजारांहून अधिक ज्‍येष्‍ठ नागरिकांना विविध प्रकारे मदत करण्‍यात आली आहे. त्या अनुषंगाने पोलीस विभागामार्फतही आजींना अधिकाधिक मदत देण्‍याचाही प्रयत्‍न केला जाणार असल्‍याचे गृहमंत्री म्हणाले.

बकरी ईद, गणेशोत्‍सव व इतर सण उत्सव साजरे करताना नागरिकांनी शांतता तसेच कोरोना संदर्भातील नियमांचे योग्य पालन करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. या वेळी आमदार चेतन तुपे उपस्थित होते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी