31 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeराजकीयतेरे नाम से सुरू, तेरे नाम पे खतम : बाळा नांदगावकर

तेरे नाम से सुरू, तेरे नाम पे खतम : बाळा नांदगावकर

टीम लय भारी

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे सध्या पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. याआधी त्यांनी नाशिक आणि औरंगाबादचा दौरा केला.महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पुण्यात मनसेला जोरदार धक्का बसला आहे. कारण रुपाली पाटील यांनी मनसेला जय महाराष्ट्र करत, राष्ट्रवादीत एन्ट्री केली आहे(Bala Nandgaonkar strongly supports MNS president Raj Thackeray)

अशाचवेळी मनसेचे माजी आमदार बाळा नांदगावकर शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चांणा उधाण आले आहे. दरम्यान, राज ठाकरेंचे जुने सहकारी बाळा नांदगावकर  त्यांची साथ सोडणार या प्रश्नाचे उत्तर देताना नांदगावकर यांनी स्पष्टीकरण देत पूर्णविराम लावला आहे तसेच त्यांनी त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया साईटवरून यासंदर्भात माहिती दिली आहे.

त्यांना लाज वाटायला हवी : ममता बॅनर्जी

समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी ‘युती’ची घोषणा केली..

मागील काही दिवसांपासून काही माझ्या पक्ष त्यागाची बातमी अनेकांनी चालवली. सोशल मीडिया च्या युगात अशा बातम्या किती जोरदार पसरतात हे आपणांस माहीतच आहे. मागील अनेक वर्षांत राजकारणात पक्ष निष्ठा, व्यक्ती निष्ठा हे विषय गौण होऊन फक्त आणि फक्त स्वतःच्या फायद्यासाठी वरचेवर पक्ष बदलणारे जरी असले तरी सगळेच असे नसतात, असं नांदगावकर म्हणाले.

माझी निष्ठा व राजकारण हे राजसाहेब यांना अर्पित आहे व राहील. त्यामुळे त्याबद्दल मला काहीच सांगायची गरज नाही, असं स्पष्टीकरण देत त्यांनी या चर्चांना पूर्णविराम लावला.

जेव्हा बलात्कार थांबवता येत नाही, तेव्हा झोपा आणि मजा करा; आमदाराचे धक्कादायक वक्तव्य

MSRTC strike: 4 days after stir, some staffers return to work

कारण जे मला ओळखतात त्यांना काहीच सांगायची आवश्यकता नाही नांदगावकर म्हणाले. एक जुने हिंदी गाणे माझ्या राजकारणाबद्दल व राजसाहेबांच्या आणि माझ्या संबंधाबद्दल सर्व एका कडव्यात सांगून जाते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी