33 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeटॉप न्यूजराज्यमंत्री बच्चू कडूंनी केला अपहार, प्रकाश आंबेडकरांची राज्यपालांकडे तक्रार !

राज्यमंत्री बच्चू कडूंनी केला अपहार, प्रकाश आंबेडकरांची राज्यपालांकडे तक्रार !

टीम लय भारी

मुंबई:- वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश बाळासाहेब आंबेडकर यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेऊन अकोल्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी केलेल्या अपहार प्रकरणी त्यांच्या विरुद्ध पोलीस चौकशी करण्यासाठी परवानगी देण्याची मागणी केली आहे.(Balasaheb Ambedkar called on GovernorBhagat Singh Koshyari)

सोमवारी सायंकाळी ५ वाजता राजभवन येथे शिष्टमंळासह दोघांची भेट झाली. यावेळी अकोला न्यायालयाने पालकमंत्री  बच्चू कडू यांनी बनावट कागदपत्रे बनवून अस्तित्वात नसलेल्या रस्त्यांवर जो शासकीय निधी गोळी करून जो अपहार केला त्याबद्दल  न्यायालयाने श्री. बच्चू कडू सकृतदर्शनी दोषी असल्याचे निरीक्षण दिले आहे.

हे सुद्धा वाचा

राज्यपालांच्या हस्ते अभिनेत्री हर्षाली मल्होत्रासह मान्यवरांना भारतरत्न डॉ आंबेडकर आणि बुद्ध शांती पुरस्कार प्रदान

राज्यपालांचा आडमुठेपणा, १२ आमदारांची माहिती अधिकारात कागदपत्रे देण्यास टाळाटाळ

विधिमंडळाचे अधिकार नाकारण्यासाठी राज्यपालांची नियुक्ती केलेली नाही : संजय राऊत

West Bengal Governor now says Lokayukta file not with him

त्यांच्या विरुद्ध चौकशी सुरू करण्याची परवानगी द्यावी अशी विनंती देखील केली. या प्रसंगी राज्यपालांनी संपूर्ण कागदपत्रे बघून या प्रकरणात कायद्याने राज्यपाल यांची पूर्व परवानगी आवश्यक आहे अशी तरतूद असल्याचे कायदेशीर कागदपत्रके त्यांस सादर करायला सांगितले आहे.

 

तसेच कायदेशीर कागदपत्रे सादर केल्यानंतर लगेच अकोला पोलीस अधीक्षक यांना पालकमंत्री श्री. बच्चू कडू यांची चौकशी करण्याचे निर्देश दिले जातील. या प्रसंगी वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष  रेखाताई ठाकूर,  प्रदेश उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुंडकर आणि मुंबई महानगर अध्यक्ष अबुल हसन खान हे उपस्थित होते.

या सर्व प्रकरणी जिल्हाधिकारी जितेंद्र पापडकर यांचे देखील नाव प्रामुख्याने समोर आले आहे. काही इतर जिल्हा मार्ग (इ.जि.मा) आणि ग्राम मार्ग (ग्रा.मा) हे शासन मान्य क्रमांक नसलेल्या रस्त्यांच्या कामांची यादी जिल्हा परिषदेला पाठवून कडू यांनी शासकीय निधीचा अपहार केल्याचे निदर्शनास आले होते.

या संदर्भातील सर्व पुरावे आणि संबंधित माहिती वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष धैर्यवर्धन पुंडकर यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. जिल्हा नियोजन समितीने नियोजित न केलेले इ.जि.मा आणि ग्रा.मा नंबर इ-टेंडरींग मध्ये टाकून त्याकरिता आलेला निधी देखील लागोलग काढल्याचे आरोप पालकमंत्री कडू यांच्यावर आहे. या संदर्भात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांना देखील या संदर्भात निवेदन दिल्याची माहिती ॲड प्रकाश आंबेडकर यांनी दिली. कलम १५६/३ अंतर्गत जिल्हान्यायालयात याचिका करण्यात आल्याचे देखील आंबेडकर यांनी सांगितले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी