31 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeटॉप न्यूजराज्यपालांचा आडमुठेपणा, १२ आमदारांची माहिती अधिकारात कागदपत्रे देण्यास टाळाटाळ

राज्यपालांचा आडमुठेपणा, १२ आमदारांची माहिती अधिकारात कागदपत्रे देण्यास टाळाटाळ

टीम लय भारी
मुंबई:- राजभवन येथील राज्यपालाचे सचिवालय विधानपरिषद सदस्यांसाठी प्राप्त 12 जणांची यादी देत नाही तसेच महाराष्ट्र शासनाने राज्यपालांकडे विधानपरिषद सदस्यांसाठी 12 जणांची यादी मंजुरीसाठी पाठविलेली आहे ते ही यादी सहित माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस देण्यास तयार नाही.(Governor’s stubbornness, refusal provide documents  MLAs)

कित्येक महिन्यापासून आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली हे यादीची मागणी करत आहे. परंतु यादी देण्यास ना राज्यपाल सचिवालय तयार आहे ना महाराष्ट्र शासन.

हे सुद्धा वाचा

भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन सुप्रीम कोर्टाकडून रद्द, सुप्रीम कोर्टाचा ठाकरे सरकारला दणका

राज्यपालांच्या हस्ते अभिनेत्री हर्षाली मल्होत्रासह मान्यवरांना भारतरत्न डॉ आंबेडकर आणि बुद्ध शांती पुरस्कार प्रदान

सईबाईंच्या समाधीस्थळाचा पुनर्विकास होणार !

Maharashtra has done remarkable work in last two years: Governor

अनिल गलगली यांनी मुख्य सचिव कार्यालयाकडे राज्य मंत्रिमंडळ बैठकीत राज्यपाल नामित 12 विधानपरिषद सदस्यांसाठी मंजूर करण्यात आलेला प्रस्ताव आणि ठरावाची माहिती मागितली होती.

मुख्य सचिव कार्यालयाने गलगली यांचा अर्ज संसदीय कार्य विभागाकडे हस्तांतरित केला. या विभागाचे कक्ष अधिकारी टी. एन. शिखरामे यांनी अनिल गलगली यांस कळविले की अद्यापही प्रकरण पूर्ण व समाप्त झाले नसल्याने ही माहिती कलम 8(1) अनुसार उपलब्ध करुन देता येत नाही.  अनिल गलगली यांच्या मते विधानपरिषद सदस्य नेमणूक आणि पाठविलेल्या यादी बाबत दोन्हीकडून टाळाटाळ केली जात आहे.

अनिल गलगली यांच्या मते विधानपरिषद सदस्य नेमणूक आणि पाठविलेल्या यादी बाबत दोन्हीकडून टाळाटाळ केली जात आहे. महाराष्ट्र शासनाने प्रामाणिकपणे ही यादी जनतेस उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे. यामुळे नेमकी अडचण काय आहे? याचा खुलासा होईल.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी