35 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeमहाराष्ट्रआपले कर्तव्य बजावून आमदार भास्कर जाधव यांची मुख्यमंत्र्यांना वाढदिवसानिमित्त अजब भेट

आपले कर्तव्य बजावून आमदार भास्कर जाधव यांची मुख्यमंत्र्यांना वाढदिवसानिमित्त अजब भेट

टीम लय भारी
मुंबई : मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवशी आज महाराष्ट्रातून अनेक ठिकाणांहून त्यांच्यावर शुभेच्छा आणि भेटींचा वर्षाव होत आहे. यानिमित्ताने शिवसेना आमदार भास्कर जाधवांनी सुद्धा मुख्यमंत्र्यांना अनोखी भेट दिली आहे. (Bhaskar jadhav gives unique gift to CM uddhav thackeray on his birthday)

सध्या बऱ्याच चर्चेत असलेल्या शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या निमित्ताने फोन केला होता. शुभेच्छांचा स्वीकार केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी भास्कर जाधवांना वाढदिवसाच्या निमित्ताने तुम्ही काय भेट देणार असा सवाल केला असता जाधवांनी त्यावर अतिशय तत्परतेने उत्तर दिले आहे.

राज्यपालांकडून पंडीत नेहरूंचा अवमान, अशोक चव्हाणांनी व्यक्त केला संताप

Bhaskar
आपले कर्तव्य बजावून आमदार भास्कर जाधव यांची मुख्यमंत्र्यांना वाढदिवसानिमित्त अजब भेट

महाराष्ट्रातल्या 5 जिल्ह्यात राज्यसरकार बांधणार संरक्षक भिंत

जराही विलंब न लावता भास्कर जाधव असे म्हणाले की रविवारी तुम्ही पाहणीसाठी येऊन गेलेल्या चिपळूण परिसरात महापुराने चिखल गाळ साचला आहे. आपल्या वतीने मी त्यावेळी जनतेला स्वच्छता करीन असे आश्वासन दिले होते.

त्यानुसार माझ्या गुहागर मतदार संघातील 400 ते 500 लोकांसहित शहराची स्वच्छता करण्यासाठी मी रस्त्यावर उतरलो आहे. आजही माझी माणसे शहराची स्वच्छता करीत आहेत. माझ्याकडून हीच तुम्हाला वाढदिवसाची भेट. असे आमदार भास्कर जाधव म्हणाले.

पंतप्रधान मोदी विकणार ‘या’ सरकारी कंपनीतील हिस्सेदारी

शिवसेना MLA भास्कर जाधव ने खोया आपा, CM उद्धव ठाकरे के सामने ही महिला पर उठाने जा रहे थे हाथ

एक महिलेशी गैरव्यवहार करत असताना कॅमेरात बंद झालेले भास्कर जाधव काही ना काही कारणांवरून चर्चेत असतात. कित्येकांना त्यांच्या बऱ्याच गोष्टी खटकतात तर काही त्यांच्या जवळील माणसे मात्र या गोष्टींकडे दुर्लक्ष करतात.

जनसेवा करणे किंवा आपल्या विभागात संकतानंतर स्वछता मोहीम राबवणे हे एक प्रकारचे आमदारांचे कर्तव्यच आहे. आपले कर्तव्य बजावून त्यांनी मुख्यमंत्र्यांना वाढदिवसाची भेट दिली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी