31 C
Mumbai
Friday, May 3, 2024
Homeराजकीयप्रदेशाध्यक्ष पदाचा कार्यभार सांभाळून 2 वर्ष पूर्ण; रुपाली चाकणकरांनी केली 'ही' खास...

प्रदेशाध्यक्ष पदाचा कार्यभार सांभाळून 2 वर्ष पूर्ण; रुपाली चाकणकरांनी केली ‘ही’ खास पोस्ट

टीम लय भारी

मुंबई:- आपल्या कामातून जनतेच्या मनात जागा निर्माण करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर, यांना आज महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा कार्यभार सांभाळून दोन वर्ष पूर्ण झालीत. प्रदेशाध्यक्षा म्हणून आज त्यांची द्वितीय वर्षपूर्ती, या दोन वर्षाच्या काळात त्यांनी पक्षासाठी नेमके काय केलं?, याचा हिशेब चाकणकरांनी पक्षाला सांगितला आहे. तसेच येत्या वर्षात पक्षासाठी कोणता संकल्प केला आहे, याची कल्पना पक्षाला देत एक खास पोस्ट केली आहे. (Rupali Chakankar has completed 2 years as the NCP Women State President)

रुपाली चाकणकर यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट टाकली. या पोस्ट मध्ये एक पत्र त्यांनी पोस्ट केले आहे. यात त्या म्हणाल्या आहेत की, आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा पदाची द्वितीय वर्षपूर्ती झाली.आदरणीय पवार साहेबांनी ही जबाबदारी माझ्या खांद्यावर दिल्यानंतर पहिले वर्ष निवडणुका, सत्ता-स्थापना, कोरोना आपत्ती या सर्व महत्वाच्या घडामोडींमध्ये गेल्यानंतर दुसऱ्या वर्षात संघटनात्मक बांधणी, कोव्हीड काळातील मदतकार्य, स्थानिक स्वराज्य निवडणुकांची मोर्चेबांधणी या संघटनात्मक घटनांनी भरगच्च असे गेले.

राष्ट्रवादीकडून पूरग्रस्तांना अडीच कोटींची मदत; शरद पवार

उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांनी भिलवडी पूरग्रस्तांची विचारपूस करत, केले सांत्वन

या काळात अनेक नवीन सहकारी या प्रवासात सोबत जोडले गेले. संपूर्ण संघटना मिडीयाच्या माध्यमातून अजून जोडली गेली. वेळोवेळी पक्षाचे प्रांताध्यक्ष जयंतजी पाटील, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, खासदार सुप्रियाताई सुळे आणि पक्षाच्या इतर सर्व जेष्ठ मंडळींच्या सल्ल्यानुसार पक्षाची सर्वच बाबतीत वेळोवेळी बहुमोल असे मार्गदर्शन केले.

rupali chakankar completed 2 years ncp state president
राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर

गावोगावी खेडोपाडी राष्ट्रवादी घरोघरी यांसारख्या अभियानाच्या माध्यमातून पक्ष अगदी लहानात लहान गाव-वस्ती पर्यंत नेण्याचा प्रामाणिक प्रयत्न राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या माध्यमातून सुरू आहे. सर्वसामान्य, तळागाळातील निष्ठावंत महिला कार्यकर्त्यांनी यावेळी मोलाची साथ दिली. वरिष्ठांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले. पक्षातील सर्वच सहकाऱ्यांनी मनापासून साथ दिली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rupali Chakankar (@rupali_chakankar)

आजवर केलेल्या कामांचा अनुभव गाठीशी असतांना येत्या काळात सुध्दा पक्षवाढीसाठी जे जे आवश्य असेल ते सर्व उपक्रम करण्याचा दृढ संकल्प आहे. आपल्या सर्वांचे प्रेम नेहमी असेच वृद्धींगत होत राहो, असे रुपाली चाकणकर म्हणाल्या आहेत.

आपले कर्तव्य बजावून आमदार भास्कर जाधव यांची मुख्यमंत्र्यांना वाढदिवसानिमित्त अजब भेट

NCP, SP ally to fight UP polls together as Pawar-Akhilesh seal the deal

रोखठोक, आक्रमक, लढणाऱ्या कार्यकर्त्या म्हणून चाकणकरांची ओळख

रुपाली चाकणकर यांची ओळख महिला प्रश्नावर लढणाऱ्या आणि पक्षाची बाजू खंबीरपणे मांडत विरोधकांना सडेतोड उत्तर देणाऱ्या नेत्या म्हणून आहे. राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाची महत्त्वाची जबाबदारी त्यांनी उत्तमरित्या पेललीय. संपूर्ण महाराष्ट्रात फिरुन राष्ट्रवादीचं महिला संघटन मजबूत करण्यावर त्यांचा भर राहिलाय. त्या पुण्याच्या स्थानिक राजकारणात देखील उत्तम भूमिका बजावतात (She has fulfilled the important responsibility of the NCP’s women state president).

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी