33 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeमुंबईपालघरमध्ये होतोय खाजगी लसीकरणांचा काळाबाजार

पालघरमध्ये होतोय खाजगी लसीकरणांचा काळाबाजार

मृगा वर्तक : टीम लय भारी

पालघर :- पालघर जिल्यातील लसीकरण केंद्रांचा गोंधळ काही नवीन नाही. वशिलेबाजीमुळे आणि तसेच उपलब्ध 100 डोस असून 70 च डोस दिले हे प्रकार वसई विरार महानगरपालिका क्षेत्रात नेहेमीच होत असतात. सरकारी लसींच्या गोंधळानंतर आता खाजगी लसीकरणाच्या काळाबाजाराचे वास्तव समोर आले आहे. या क्षेत्रात दररोज 7 ते 8 सशुल्क लसीकरण ड्राइव्ह आयोजित केले जातात (The black market of private vaccinations is taking place in Palghar).

वसईतील होळी भागातील सेंट एलिझाबेथ कॉन्व्हेंट स्कुल मध्ये आयोजित करण्यात आलेल्या लसीकरण कार्यक्रमांतर्गत लसीचे शुल्क कोविन ऍप वर 780 रूपये दिलेले होते. परंतु सेंटर वर तिथले स्वयंसेवक प्रत्येकी 850 रुपये घेत होते. शुल्क कोणत्याही प्रकारे ऑनलाइन किंवा कार्ड मार्फत न घेता फक्त रोख रक्कम घेतली जाते.

मुख्यमंत्र्यांनी केलेल्या नामनियुक्त सदस्यांसंबंधित याचिकेबाबत राज्यपाल कोश्यारींचे दुर्लक्ष

एमपीएससी विद्यार्थ्यांना दिलासा, नियुक्ती संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भरवली बैठक

तसेच मागितल्याशिवाय पावतीसुद्धा दिली जात नाही. लसीकरणानंतर पावती मागितल्यास अर्धातास खोळंबून राहावे लागते. परंतु पावतीवर 780 रुपये स्वीकारली असे लिहिले जाते. उर्वरित 70 रुपयांचे काय हा प्रश्न विचारला असता इथल्या स्वयंसेवकांना सेवा भत्ता म्हणून दिला जातो. तसेच त्याची सेवा शुल्क अशी पावती सुद्धा मिळत नाही. ही सर्व माहिती स्मिता डिसोझा या लस लाभार्थीने सोशल मीडियावर नाराजी व्यक्त करीत सांगितले (All this information was shared by Smita DSouza a vaccine beneficiary on social media).

Black market of private vaccinations is taking
लसीकरण पावती

तुला आमदार मंत्री व्हायचं असेल तर बायकोवर लिंबू ओवाळून टाक

Coronavirus India Latest Update Live: Serum Institute to manufacture Sputnik V in Sept; India’s first Covid patient tests +ve again

लसींचा तुटवडा भासवून व गरज तयार करून गोरगरिबांची आणि लाभार्थ्यांची अशा प्रकारे फसवणूक केली जाते. प्रत्येकी 70 रुपये बेकायदेशीर पणे हजारो लाभार्थ्यांकडून आकारून त्याचे काय केले जाते असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जातो.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी