33 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeमंत्रालयBREAKING : ‘कोरोना’ग्रस्त मंत्र्यांना मुंबईत हलविण्याची शक्यता, सचिव सुद्धा झाले ‘कॉरन्टाईन’

BREAKING : ‘कोरोना’ग्रस्त मंत्र्यांना मुंबईत हलविण्याची शक्यता, सचिव सुद्धा झाले ‘कॉरन्टाईन’

टीम लय भारी

मुंबई / नांदेड : ‘कोरोना’ झालेल्या काँग्रेसच्या त्या मातब्बर मंत्र्यांना तातडीने मुंबईत आणले ( BREAKING ) जाण्याची शक्यता आहे. त्यासाठी विशेष विमानाची सोय करण्यासाठी प्रयत्न सुरू होते. विमान उपलब्ध झाले नाही, तर ॲम्ब्युलन्समधून त्यांना मुंबई नेण्यात येऊ शकते. याबाबत सकाळी निर्णय होईल असे या सूत्रांनी सांगितले.

मुंबईतील ‘ब्रीच कॅण्डी’ रूग्णालयात ( BREAKING ) या मंत्र्याना दाखल केले जाणार आहे. त्यासाठी व्हिआयपी बेडची नोंद करण्यात आली आहे.

Mahavikas Aghadi

मंत्र्यांची तब्येत सध्या ठणठणीत आहे. त्यांना कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. परंतु त्यांना मधुमेहाचा त्रास आहे. त्यांनी वयाची साठी ओलांडलेली आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना तातडीने मुंबईत हलविण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

सचिव सुद्धा झाले ‘होम कोरन्टाईन’

मंत्र्यांचा ‘कोरोना’ पॉझिटिव्ह अहवाल आज प्राप्त झाला आहे. परंतु हे मंत्री जे खाते सांभाळतात, त्या खात्याचे सचिव ( BREAKING )  कालच होम कॉरन्टाईन झाले आहेत.

मंत्री दहा – बारा दिवस मुंबईत होते. त्यांच्या संपर्कात खासगी सचिव, विशेष कार्य अधिकारी व इतर कर्मचारी वर्ग आला असण्याची शक्यता आहे. त्यामुळे या अधिकारी व कर्मचारी वर्गालाही ‘होम कोरन्टाईन’ व्हावे लागेल असे सूत्रांनी सांगितले.

दरम्यान, मुंबईत असताना मंत्र्यांबरोबर मराठवाड्यातील अन्य एक आमदार सतत सोबत होते. परंतु या आमदारांचा वैद्यकीय अहवाल निगेटिव्ह आला असल्याचे या सूत्रांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा

BIG BREAKING : ‘काँग्रेस’च्या मंत्र्यांना ‘कोरोना’

Lockdown : संकटात राजकारणापेक्षा जबाबदारी आणि जनहित महत्वाचे

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी