30 C
Mumbai
Tuesday, May 21, 2024
Homeव्यापार-पैसाSmartphone Offers Update : अवघ्या 539 रूपयांत मिळणार स्मार्टफोन!

Smartphone Offers Update : अवघ्या 539 रूपयांत मिळणार स्मार्टफोन!

लवकरच फ्लिपकार्टचा बिग बिलियन सेल चालू होणार आहे या सेलमध्ये स्मार्ट फोनवर प्रचंड सूट तुम्हाला मिळणार आहे. विशेषतः Redmi च्या स्मार्टफोनवर तर खूपच सूट तुम्हाला मिळणार आहे

स्मार्टफोन घेण्यासाठी बरेचजण दिवाळी ऑफर किंवा कोणत्या सीझन सेलची वाट पाहत असतात कारण त्यावेळी किंमती कमालीच्या घसरलेल्या असतात म्हणून अनेकांचा कल याचवेळी फोन खरेदी करण्याचा पाहायला मिळतो, परंतु त्याआधीच जर तुम्हाला कमी किंमतीत स्मार्टफोन उपलब्ध होत असेल तर, विश्वास नाही ना बसत पण आता लवकरच फ्लिपकार्टचा बिग बिलियन सेल चालू होणार आहे. या सेलमध्ये स्मार्ट फोनवर प्रचंड सूट तुम्हाला मिळणार आहे. विशेषतः Redmi च्या स्मार्टफोनवर तर खूपच सूट तुम्हाला मिळणार आहे, त्यामुळे तुम्हाला महाग वाटत असलेला स्मार्टफोन अगदी तुमच्या खिशाला परवडेला अशा किंमतीत तुम्हाला मिळणार आहे.

Redmi च्या स्मार्टफोनबाबत Redmi 9i Sport वर उपलब्ध असलेल्या भरघोस सूटबद्दल Mi ने सोशल मीडियावर ट्विट केले आहे. सध्या Redmi 9i Sport ची किंमत 9999 हजार रुपये इतकी आहे, पण तुम्ही हाच मोबाईल फ्लिपकार्टच्या बिग बिलियन डेज सेलमध्ये 3000 रुपयांच्या सवलतीने मिळणार आहे, म्हणजेच सदर फोन केवळ  6999 रुपये किंमतीत विकत घेता येणार आहे. याशिवाय या सेलमध्ये ICICI आणि Axis बँकेच्या ग्राहकांसाठी पर्वणी ठरणार आहे कारण त्यांनी इथे 10 टक्के त्वरीत सूट मिळणार आहे.

हे सुद्धा वाचा…

Eknath Shinde : एकनाथ शिंदे – देवेंद्र फडणविसांच्या कार्यालयाबाहेर ‘ED’ चा फलक

iPhone 14 Series : आयफोन 14 घ्यायचाय? या ठिकाणी आयफोन मिळतोय स्वस्त

iPhone 14 launch : नव्या आयफोनचे देखणे रुप पाहिले का?

फ्लिपकार्डच्या या सेलमध्ये तुम्हाला आणखी वेगवेगळी सूट मिळणार आहे. यामध्ये ज्या फोनची किंमत 9999 इतकी आहे त्यांना सदर फोन केवळ 7999 रुपयांमध्ये उपलब्ध होणार आहे. या सेलदरम्यान तुम्ही  जर ICICI आणि Axis बँकेचे ग्राहक असाल तर तुम्हाला आणखी सूट मिळणार आहे. दोन्ही बॅंकांच्या क्रेडिट कार्ड पेमेंटवर 10 % सूट ठेवण्यात आलेली आहे. जर या क्रेडिट कार्डवर तुम्ही फोन घेण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला त्यासाठी साधारण 5000 पर्यंत शाॅपिंग करावी लागणार आहे. सवलतींता लाभ आणखी घ्यायचा असल्यास तुम्ही तुमचा जुन्या फोन एक्सचेंज करू शकता त्यावर तुम्हाला 7460 एवढी सूट मिळणार आहे आणि जर Redmi 9i Sport खुपच चांगल्या स्थितीत असेल तर तो तुम्हाला सहजपणे 539 मिळू शकतो.

या Redmi 9i Sport विषयी सांगायचे झाल्यास हा फोन तीन रंगांच्या पर्यायात सध्या उपलब्ध आहे. या फोनमध्ये 6.53 इंच HD+ डिस्प्ले असून 13 MP रियर कॅमेरा सुद्धा आहे. यामध्ये 5 MP फ्रंट कॅमेऱ्यांची सुद्धा सुविधा देण्यात आलेली आहे. 5000 mAh बॅटरी आहे, तर MediaTek Helio G25वर सदर फोन चालतो.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी