35 C
Mumbai
Sunday, April 28, 2024
Homeव्यापार-पैसाiPhone 14 Series : आयफोन 14 घ्यायचाय? 'या' ठिकाणी आयफोन मिळतोय स्वस्त

iPhone 14 Series : आयफोन 14 घ्यायचाय? ‘या’ ठिकाणी आयफोन मिळतोय स्वस्त

अॅपल कंपनीने नुकताच iPhone 14 सीरीजला लाॅंन्च केले आहे. यंदाच्या वर्षी ‘Far Out’ या इव्हेंटमध्ये हा सोहळा पार पडला. या सोहळ्या दरम्यान या iPhone 14 च्या किमती, वेगळे फिचर्स अशा विविधांगी पद्धतीने वैशिष्ट्य सांगत अॅपलप्रेमींना यावेळी आकर्षित करण्यात आले. नेहमीप्रमाणे यावेळी सुद्धा आयफोन 14 ची किंमत अमेरिकेपेक्षा भारतात जास्त ठेवण्यात आली आहे. केवळ अमेरिकाच नव्हे तर यूके, चीन, यूएई या देशांतील आयफोन किमतीपेक्षा जास्त दराने भारतात किंमत किंबहुना जास्त ठेवण्यात आलेली आहे, त्यामुळे भारतीय अॅपल युजर्ससमोर मोठा प्रश्न उभा राहिला आहे. दरम्यान दुबई आणि हाँगकाँग मध्ये आयफोनची किंमत कमी आहे. त्यामुळे कसला विचार करताय?

भारतातील आयफोनच्या किमतींपेक्षा दुबई आणि हाँगकाँगमध्ये आयफोनचे दर कमालीचे खाली असल्याचे पाहायला मिळत आहे. दुबईत आयफोन 14 प्रो आणि 14 प्रो मॅक्स या फोनला तुम्ही भारतीय किमतींच्या तुलनेत 40 हजार रुपयांपेक्षा कमीकिंमतीत तुम्ही घेऊ शकता. तसेच हाँगकाँग मध्ये सुद्धा आयफोन 14 प्रो मॅक्सची किंमत भारतीय आयफोनच्या तुलनेत तब्बल 44 हजार रुपयांनी कमी आहे. पण जर भारतात कोणाला आयफोन 14 घ्यायचा असल्यास 1 लाख 29 हजार 900 रुपये मोजावे लागणार आहेत, तर iPhone 14 Pro Max ची सुरुवातीची किंमत 1 लाख 39 हजार 900 रुपये इतकी आहे.

हे सुद्धा वाचा…

Lumpy Skin Disease: लम्पीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून प्रत्येक जिल्हयाला १ कोटींची मदत जाहीर

Jayant Patil : मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री माफी मागतील का, जयंत पाटलांचा कडवा सवाल

University : महाराष्ट्र आणि अमेरिकेतील विद्यापीठे एकत्र आणण्याचा सरकारचा प्रयत्न

एका मीडिया रिपोर्टनुसार, भारतात आयफोन 13 प्रो सीरीजच्या किंमतीच्या तुलनेत 10 हजारांची वाढ केली तर आयफोन 14 प्रो सीरीज घेता येतो. केवळ भारतच नव्हे तर युके, जपान आणि जर्मनी या देशांमध्ये सुद्धा आयफोन 14 च्या किमती मोठ्या असल्याच्या पाहायला मिळत आहेत. तरीही सगळ्यांमध्ये तुलना करायला गेल्यास आयफोनची सगळ्यात कमी किंमत अमेरिकेत आहे. अमेरिकेत सारखाच फोन परंतु त्याची किंमत 7 हजार 631 रुपये आहे तर त्याच फोनची किंमत भारतात 1 लाख 39 हजार 900 रुपये इतकी आहे, त्यामुळे नवा आयफोन विकत घेताय तर इतर सुद्धा पर्याय पाहणे गरजेचे आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी