33 C
Mumbai
Monday, May 6, 2024
HomeमुंबईHospital Fire Incident: पीडब्लूडी विभागाला विचारात न घेतल्यामुळे रुग्णालयात आगी...

Hospital Fire Incident: पीडब्लूडी विभागाला विचारात न घेतल्यामुळे रुग्णालयात आगी वाढत आहेत

राज्यातील रुग्णालयात आगीच्या घटना वाढत आहे. या दुर्घटनेत अनेक निष्पापांना जीव गमवावा लागला आहे. या आगीच्या घटनांमागील कारण म्हणजे पीडब्लूडी विभागाच्या (PWD Department) विद्युत विभागाला विचारात न घेणे, असे स्पष्ट मत अभियंता दिनी कार्यकारी अभियंता हेमंत पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) आणि अप्पर मुख्य सचिव मनोज सौनिक (Manoj Saunik) यांच्यासमोर व्यक्त केले आहे. सायन येथील षण्मुखानंद सभागृह येथे सार्वजनिक बांधकाम आणि विद्युत विभागातर्फे गुरूवारी अभियंता दिन (Engineers Day) साजरा करण्यात आला. राज्यभरातील पीडब्लूडी विभागाचे अभियंता उपस्थित होते.

राज्यातील रुग्णालयात आगीच्या घटना वाढत आहे. या दुर्घटनेत अनेक निष्पापांना जीव गमवावा लागला आहे. या आगीच्या घटनांमागील कारण म्हणजे पीडब्लूडी विभागाच्या (PWD Department) विद्युत विभागाला विचारात न घेणे, असे स्पष्ट मत अभियंता दिनी कार्यकारी अभियंता हेमंत पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) आणि अप्पर मुख्य सचिव मनोज सौनिक (Manoj Saunik) यांच्यासमोर व्यक्त केले आहे. सायन येथील षण्मुखानंद सभागृह येथे सार्वजनिक बांधकाम आणि विद्युत विभागातर्फे गुरूवारी अभियंता दिन (Engineers Day) साजरा करण्यात आला. राज्यभरातील पीडब्लूडी विभागाचे अभियंता उपस्थित होते. यावेळी उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अभियंत्यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. सोबत कामकाजासंदर्भात अभियंत्यांची मतेही यावेळी जाणून घेण्यात आली. यावेळी पीडब्लूडी विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता पाटील म्हणाले की, पीडब्लूडीचे विद्युत विभाग हे रुग्णालयाची दुरुस्ती व देखभाल करत असते. यात वीज सुरक्षा आणि अग्निसुरक्षा हा कळीचा मुद्दा आहे. स्थानिक पातळीवर बरेच देणगीदार देणगी देत असतात. यातून नवनवीन यंत्रणा बसविली जात असते. वातानुकूलित यंत्रणा, सिटिस्कॅन यंत्रणा, एआरआय यंत्रणा तसेच आरोग्य विभागाच्या आणखी काही यंत्रणा काम करत असतात. तेव्हा रुग्णालयाच्या यंत्रणेचा भार हा विद्युत विभागावर येतो.

ते पुढे म्हणाले की, ज्यावेळी एखादी नवीन यंत्रणा बसवली जाते तेव्हा पीडब्लूडी विद्युत विभागाला काहीच विचारले जात नाही. एआरआय आणि सिटिस्कॅनचा लोड 100 ते 200 किलो वॉट असतो. अशावेळी शॉर्टसर्किट आणि आग लागण्याची भीती असते. अशा घटना ही घडलेल्या आहेत आणि घडत ही आहेत.

यावर उपाययोजना म्हणून वरिष्ठ पातळीवर एक परिपत्रक काढण्यात यावे. नवीन यंत्रणा बसविताना रुग्णालय प्रशासनाने पीडब्लूडी विद्युत विभागाला कळवणे आवश्यक आहे. मात्र रुग्णालय प्रशासन हे पीडब्लूडी विद्युत विभागाला विचारत नसल्याने आगीचे प्रमाण वाढत आहे, असे ते स्पष्ट म्हणाले.

हे सुद्धा वाचा –

Narendra Modi : ‘नरेंद्र मोदींनी पीडब्ल्यूडी खाते स्वच्छ करण्यासाठी मला पाठवले आहे’

Salman Khan Murder Planning : सलमान खानच्या हत्येचा कट लॉरेन्स बिश्नोई टोळीचा प्लान ‘बी’ होता

UP Dalit Sisters Murder : उत्तर प्रदेशमध्ये दलित बहिणींच्या बलात्कार आणि हत्येप्रकरणी 6 जणांना अटक

मागील वर्षीच्या राज्यभरातील आगीच्या घटना –

मागील वर्षी अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात लागलेल्या आगीत 10 जणांचा मृत्यू झाला होता.
नाशिकमध्ये डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन टँकमध्ये गळती होऊन रुग्णालयातील 24 कोरोना रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.

भंडारा जिल्हा रुग्णालयातील शिशू केअर युनिटला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांचा मृत्यू झाला होता. त्यात 8 मुली तर 2 मुलांचा समावेश होता. या आगीत 3 बालकांचा होरपळून तर 7 बालकांचा धुरामुळे गुदमरून मृत्यू झाला होता.

कोल्हापूर जिल्हा रुग्णालय सीपीआर (छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय) येथील ट्रामा केअर विभागात आग लागली होती. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. आग लागली त्यावेळी वॉर्डात 16 रुग्ण होते.

भांडूपमधील ड्रीम मॉलमधील कोविड रुग्णालयात रात्रीच्या सुमारास भीषण आग लागली होती. या आगीत रुग्णालयातील 11 कोरोना रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला होता.

नागपूरमधील वाडी इथल्या वेल्ट्रिट कोविड केअर सेंटरला आग लागल्याची घटना घडली होती. या आगीत 4 रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला होता.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी