31 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeमहाराष्ट्र'Sairat' fame Suraj Pawar Cheating case : सूरज पवार अडचणीत ;...

‘Sairat’ fame Suraj Pawar Cheating case : सूरज पवार अडचणीत ; फसवणुकीच्या प्रकरणात होऊ शकते अटक

मराठी चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळेंच्या (Nagraj Manjule) 'सैराट' (Sairat) या चित्रपटामध्ये 'प्रिन्स दादा' ची नकारात्मक भूमिका साकारलेला अभिनेता सूरज पवार (Suraj Pawar) मोठया अडचणीत येण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्हयामध्ये त्याच्या विरोधात आर्थिक‍ फसवणूकीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे, अशी माहिती स्थानिक पोलिसांनी दिली आहे.

मराठी चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळेंच्या (Nagraj Manjule) ‘सैराट’ (Sairat) या चित्रपटामध्ये ‘प्रिन्स दादा’ ची नकारात्मक भूमिका साकारलेला अभिनेता सूरज पवार (Suraj Pawar) मोठया अडचणीत येण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्हयामध्ये त्याच्या विरोधात आर्थिक‍ फसवणूकीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे, अशी माहिती स्थानिक पोलिसांनी दिली आहे. सूरज पवारने प्रसिद्ध मराठी चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळेंच्या ‘सैराट’, ‘पिस्तुल्या’ आण‍ि ‘फॅन्ड्री’ या चित्रपटामध्ये भूमिका साकारल्या आहेत. सूरज पवार आणि त्याच्या इतर तीन साथीदारांनी काही लोंकांना मुंबईस्थित मंत्रालयामध्ये सरकारी नोकरी देण्याचे आमिष दाखवून त्याबदल्यात पैसे घेतल्याची तक्रार नोंदविण्यात आलेली आहे. त्यामुळे अधिक चौकशीसाठी त्याला अहमदनगरमधील स्थानिक पोलिसांनी (Ahmednagar Police Station) बोलावले आहे.

अहमदनगर पोलिसांनी 9 सप्टेंबर रोजी पैशांच्या मोबदल्यात मंत्रालयात सरकारी नोकरी देण्याचे आमिष दाखवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला होता.

पोलिसांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, आर्थिक फसवणूक करणाऱ्या या टोळीने 5 लाख रूपयांच्या मोबदल्यात काही लोकांना मंत्रालयात सरकारी नोकरी देण्याचे आमिष दाखवले. त्यांच्या या थापांना भूलून जाऊन तक्रारदारांनी कथित आरोपींना 2 लाख रूपयांची रोकड अहमदनगरमधील राहुरीस्थित कृषी विदयापीठात दिली. सरकारी नोकरीमध्ये रूजू झाल्यानंतर उर्वरित 3 लाख रूपये देण्यात यावे असे आरोपींकडून तक्रारदारांना सांगण्यात आले होते.

हे सुद्धा वाचा –

UP Dalit Sisters Murder : उत्तर प्रदेशमध्ये दलित बहिणींच्या बलात्कार आणि हत्येप्रकरणी 6 जणांना अटक

Mumbai Toilet Story : मुंबई महापालिका घडवतेयं शौचालय सम्राट!

UP Dalit Sisters Murder : उत्तर प्रदेशमध्ये दलित बहिणींच्या बलात्कार आणि हत्येप्रकरणी 6 जणांना अटक

या आरोपींनी संगणक ग्राफिक्सच्या सहाय्याने राज्याच्या सामान्य प्रशासकीय विभागातर्फे जारी करण्यात येणारी नकली कागदपत्रे तयार केली होती. तपासाअंती, पोलिस अधिकाऱ्यांनी नकली सरकारी स्टॅम्प आणि इतर बनावट कागदपत्रे आरोपींकडून हस्तगत केली.

या प्रकरणाच्या तपास करणाऱ्या अधिकाऱ्याने असे सांगितले की, अटक झालेल्या दोन आरोपींनी कबूल केले की, त्यांनी सूरज पवारच्या मदतीने नकली सरकारी स्टॅम्प आणि सीलबंद कागदपत्रे तयार केली. या प्रकरणातील एक आरोपी सूरज पवारसह तेथील स्थानिक स्टॅम्प तयार करणाऱ्या विक्रेत्याकडे गेला. त्यांनी या स्टॅम्प तयार करणाऱ्या विक्रेत्याला सांगितले की, आम्हाला एका चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी बनावट स्टॅम्पची गरज आहे. आरोपींनी त्या विक्रेत्याला हमीसुद्धा दिली की ते या स्टॅम्पचा कोणताही गैरवापर करणार नाही.‍

पोलिस अधिकाऱ्याने स्पष्ट केले की, आम्हाला मिळालेल्या पुरांव्यामुळे असे दिसून येते की, सूरज पवार हा या प्रकरणात सहआरोपी आहे. त्यामुळे त्याची या प्रकरणात काय भूमिका आहे हे जाणून घेण्यासाठी त्याला अहमदनगर येथील स्थानिक पोलिस स्टेशनमध्ये चौकशीसाठी बोलविण्यात येणार आहे. चौकशीअंती, त्याच्यावर कोणती कारवाई करण्यात यावी यावर निर्णय घेऊ.

 

अश्विन शेश्वरे
अश्विन शेश्वरेhttp://laybhari.in
He writes about National and Maharashtra Politics, Education, Health, Civic, Legal, Crime and Sports beat for LayBhari News.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी