31 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeराजकीयचंद्रकांतदादांना स्वप्ने बघण्याचा छंद? ; जयंत पाटलांची बोचरी टीका

चंद्रकांतदादांना स्वप्ने बघण्याचा छंद? ; जयंत पाटलांची बोचरी टीका

टीम लय भारी

मुंबई :-  केंद्रात कोरोनाची चिंताजनक परिस्थिती पाहून अधिवेशन रद्द करण्यात आले आहे. राज्य सरकार अधिवेशन का घेत नाही, याचे कारण जगजाहीर आहे. पण आता चंद्रकांत पाटील यांनाच स्वप्ने बघण्याचा छंद आहे, त्यावर मी काय बोलणार?; अशी बोचरी टीका जयंत पाटील यांनी केली(Chandrakant Patil has a hobby of dreaming, what can I say about that ?; Jayant Patil made such a scathing remark).

राज्य सरकारने अधिवेशन घेण्याची हिंमत दाखवावी असे चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) म्हणतात. केंद्राचा नियम हा प्रत्येक राज्यालाही लागू होतो. त्यामुळे महाराष्ट्रतही अधिवेशन होणार नसल्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

मराठा आरक्षणावरून अशोक चव्हाणांचा भाजपला खोचक टोला

सोशल मिडियावर बंदी घातली तर भक्तमंडळ आनंदसोहळा कसे साजरा करणार?; शिवसेनेचा टोला

Coronavirus: Delhi to begin easing curbs from May 31, says CM

जयंत पाटील (Jayant Patil) यांनी मीडियाशी संवाद साधताना चंद्रकांत पाटलांवर (Chandrakant Patil) निशाणा साधला. राज्य सरकार अधिवेशन का घेत नाही, याचे कारण जगजाहीर आहे. राज्य सरकारने अधिवेशन घेण्याची हिंमत दाखवावी असे चंद्रकांत पाटील ((Chandrakant Patil) म्हणतात. मग पंतप्रधानांनाही लोकसभेचे अधिवेशन घेण्याची हिंमत आहे की नाही यावर चर्चा होऊ शकते, असा चिमटा जयंत पाटलांनी काढला. कोरोना आहे त्यामुळे पंतप्रधान आणि लोकसभेचे सदस्य एकत्र येऊ शकत नाहीत. हीच परिस्थिती देशातील सर्व राज्यांना लागू आहे. कोरोनाचा संसर्ग वाढल्याने आपण अधिवेशन घेणे थांबवले आहे, असे ते म्हणाले.

लॉकडाऊनचा निर्णय मुख्यमंत्रीच घेतील

यावेळी त्यांनी लॉकडाऊनवरही भाष्य केले. लॉकडाऊनबाबत वेगवेगळ्या जिल्ह्यासाठी वेगवेगळी रणनीती ठरवावी लागेल. कोरोनाचे संकट अजून टळलेले नाही. पण परिस्थिती थोडी बरी आहे. परंतु लॉकडाऊनचा निर्णय मुख्यमंत्रीच घेतील, असेही ते म्हणाले.

पदोन्नतीतील आरक्षणावर मतभेद नाही

पदोन्नतीतील आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात कोणतेही वाद नाहीत. कोर्ट, कचेरी आणि कायद्याच्या स्तरावर काही निर्णय झाले आहेत. त्यातून मार्ग कसा काढायचा याचे प्रयत्न सुरू आहेत. परंतु, अजितदादा पदोन्नतीतील आरक्षणाच्या विरोधात असल्याचे चित्रे रंगवले जात आहे. काही लोक हे काम करत असून हे दुर्देवी आहे. या मुद्दयावरून सरकारमध्ये कोणतेही मतभेद नाहीत. याबाबत कायद्याचा अभ्यास करून उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या अधीन राहूनच काम करावे लागेल, असे ही त्यांनी स्पष्ट केले.

मराठा आरक्षणाप्रश्नी संभाजीराजे अग्रेसर

यावेळी त्यांनी भाजपचे खासदार संभाजी छत्रपती यांच्या मराठा आरक्षणाच्या दौऱ्यावरही प्रतिक्रिया व्यक्त केली. मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही संभाजीराजेंची सुरुवातीपासूनची भूमिका आहे. राज्यातील सर्व मराठा नेत्यांनी आरक्षण मिळावा म्हणून प्रयत्न सुरू केला आहे. त्यात संभाजीराजे अग्रेसर आहेत. पण हा प्रश्न केंद्राच्या हातात आहे. लोकसभेत घटना दुरुस्ती करून निर्णय घ्यावा लागेल. त्यासाठी सर्वांना भेटून पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यंत भूमिका पोहोचवण्याचे काम संभाजीराजे करत आहेत, असे ते म्हणाले. चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) म्हणतात ते सर्व खरे असते असे नाही. त्यामुळे त्यावर भाष्य न केलेले बरे. मराठा आरक्षणाचा प्रश्न जटील आहे. तो सुटायला हवा, असा सगळ्यांचाच आग्रह आहे, असेही ते म्हणाले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी