29 C
Mumbai
Monday, May 6, 2024
Homeमहाराष्ट्रमराठा आरक्षणावरून अशोक चव्हाणांचा भाजपला खोचक टोला

मराठा आरक्षणावरून अशोक चव्हाणांचा भाजपला खोचक टोला

टीम लय भारी

मुंबई :-  सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण (Maratha Reservation) रद्द केले आहे. मराठा समजाला सुप्रीम कोर्टाचा हा निर्णय मान्य नाही. त्यामुळेच मराठा समाज आक्रमक झाला आहे. मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावरून सुरू झालेल्या मोर्चात भाजपही सामील झाला आहे. यावरूनच मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी भाजपवर खोचक टोला लगावला आहे (Ashok Chavan, chairman of the Maratha Reservation Sub-Committee, has slammed the BJP).

मराठा आरक्षण (Maratha Reservation) प्रश्न सोडवण्यासाठी हातात हात घालून काम करण्याची गरज आहे. आम्ही आरक्षण मिळावे म्हणून प्रयत्न करत आहोत, तर भाजप मोर्चे काढत आहे. बघू आरक्षणाच्या मुद्द्यावर कोण किती प्रामाणिक आहे, अशा शब्दात अशोक चव्हाण यांनी भाजपवर खोचक टोला हाणला आहे (Ashok Chavan has hit the BJP hard).

मराठा आरक्षणाबाबत भाजपला कळकळ आहे असा दिखावा : अशोक चव्हाणांचा खोचक टोला

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून संभाजीराजे उद्धव ठाकरेंची भेट घेणार

‘We have been reduced to a mockery’: Calcutta HC judge questions handling of Narada bribery case

अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी ट्विट करून भाजपवर टीका केली आहे. मराठा आरक्षण (Maratha Reservation) टिकावे म्हणून महाविकास आघाडीने प्रयत्न सोडलेले नाहीत. ज्यांच्या काळात कायदा आला ती भाजप मात्र प्रयत्न सोडून मोर्चाचे इशारे देते आहे. दोघांमधील फरक स्पष्ट आहे आणि हेतूही स्पष्ट आहे. हातात हात घालून काम केले तर अजूनही वेळ गेलेली नाही. बघू कोण किती प्रामाणिक आहे ते?, असा टोला अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी लगावला आहे.

पाटील कोल्हापूरच्या मोर्चात

कोल्हापुरात मराठा तरुणांनी लाक्षणिक उपोषण सुरू केले आहे. या आंदोलनात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) ही सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावरून राज्य सरकारवर टीका केली. मराठा समाजाला लवकरात लवकर आरक्षण देण्यासाठी जे जे लोक आंदोलन करतील त्या आंदोलनात भाजपचा झेंडा न घेता आणि भाजपचा कार्यकर्ता असल्याची ओळख न दाखवता आम्ही सहभागी होणार आहोत, असे मी म्हणालो होतो. त्यानुसार आम्ही या आंदोलनात सहभागी झालो आहोत. कोल्हापुरातील सर्व तालमी, सर्व संघटना आणि मंडळांनी पुढाकार घेऊन हे लाक्षणिक उपोषण सुरू केले आहे. या लाक्षणिक उपोषणाचे पुढे काय होते हे माहीत नाही. या आंदोलनात भाजपचा अध्यक्ष म्हणून नव्हे तर नागरिक म्हणून मी आलो आहे, असे चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) म्हणाले.

रोज दळण दळत बसता, हे चालणार नाही

मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करा. पण या सरकारला ही याचिका दाखल करायची नाही. त्यांना मराठा समाजाला न्याय द्यायचा नाही. 102 व्या घटनादुरुस्तीनुसार मागास आयोग नेमण्याचा अधिकार सरकारला आहे. पण दीड वर्षात हा आयोग स्थापन केला नाही, अशी टीका त्यांनी केली. मराठा समाजातील मेडिकलच्या विद्यार्थ्यांची फी भरण्याचे काम सरकार करत नाही. रोज दळण दळत बसता. हे चालणार नाही. सारथी संस्थेचा पत्ता नाही, अण्णासाहेब पाटील, पंजाबराव देशमुख निर्वाह भत्ता कशाचा कशाचा पत्ता नाही, असा घणाघाती हल्लाही त्यांनी केला.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी