29 C
Mumbai
Monday, May 6, 2024
Homeराजकीयदेशाची माफी मागायला पंतप्रधानांना आजच्या सारखा दिवस मिळणार नाही, काँग्रेसचा टोला

देशाची माफी मागायला पंतप्रधानांना आजच्या सारखा दिवस मिळणार नाही, काँग्रेसचा टोला

टीम लय भारी

मुंबई :- देशात कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. देशातील कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी अद्याप धोका कायमच आहे. लसीकरणाबाबत योग्य नियोजन केले गेले नाही तर कोरोना महामारीच्या अनेक लाटा येतच राहातील, असा इशारा राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी मोदींना दिला आहे. यावरूनच ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनीही मोदींना लक्ष्य केले आहे (Energy Minister Nitin Raut has also targeted Modi).

देशातील अनेक राज्यात अ्दयापही लॉकडाऊन असून जनजीवन पूर्ववत होण्यास अवधी लागणार आहे. त्यातच, गृहमंत्रालयाने 30 जून पर्यंत लॉकडाऊनबाबत स्थानिक प्रशासनाने निर्णय घ्यावेत, असे सूचवले आहे. कोरोनाच्या या सर्व मुद्द्यांबाबत काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पत्रकार परिषद घेऊन केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली. देशाची माफी मागायला पंतप्रधानांना आजच्या सारखा दिवस मिळणार नाही असा टोला ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी हाणला आहे (Energy Minister Nitin Raut has said that the Prime Minister will not get a day like today to apologize to the country).

चंद्रकांतदादांना स्वप्ने बघण्याचा छंद? ; जयंत पाटलांची बोचरी टीका

मराठा आरक्षणावरून अशोक चव्हाणांचा भाजपला खोचक टोला

Cyclone Yaas: Modi reviews situation in Odisha, West Bengal; Mamata Banerjee skips meet

देशात आज स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची 138 जयंती साजरी करण्यात येत आहे. मुख्यमंत्र्यांपासून ते पंतप्रधान (Prime Minister) नरेंद्र मोदींपर्यंत दिग्गज नेत्यांनी सावरकर यांना आदरांजली वाहिली आहे. परंतु, आजच्या जयंतीदिनाचा उल्लेख करत नितीन राऊत (Nitin Raut) यांनी मोदींवर निशाणा साधला आहे. देशातील कोविडची साथ हाताळता आली नाही याबद्दल पंतप्रधानांनी (Prime Minister) देशाची माफी मागायला आजचा सावरकर जयंतीसारखा उत्तम मुहूर्त मिळणार नाही, असे ट्विट करत राऊत यांनी मोदींवर निशाणा साधला आहे.

अंदमानच्या तुरुंगात कैद असताना सावरकर यांनी इंग्रजांना माफीचे पत्र लिहिले होते, असे सांगण्यात येते. यापूर्वी राहुल गांधींनी (Rahul Gandhi) जाहीर सभेत या माफीचा उल्लेख केला होता. मंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांनी हाच धागा पकडत मोदींवर निशाणा साधला आहे.

दुसऱ्या लाटेला मोदींची नौटंकीच कारणीभूत

काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी आज दुपारी 12.30 वाजता पत्रकार परिषद घेतली. त्यामध्ये, कोरोना, लॉकडाऊन, उपाययोजना आणि नागरिकांच्या समस्यांसंदर्भात भाष्य केले. यावेळी, केंद्र सरकार कोरोनाला रोखण्यात अपयशी ठरल्याचा आरोपही राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींची (Prime Minister Narendra Modi) नौटंकी हेच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे प्रमुख कारण आहे. अद्यापही त्यांनी कोरोनाला समजून घेतले नाही. देशातील कोरोना मृत्यूदराची आकडेवारी खोटी असल्याचा आरोपही राहुल गांधींनी केला आहे. तसेच, सरकारने खरी आकडेवारी जनतेसमोर ठेवावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी