29 C
Mumbai
Tuesday, August 2, 2022
घरक्राईमप्रियकराने पळवून नेलेल्या 15 वर्षीय मुलीचा संशयास्पद मृत्यू

प्रियकराने पळवून नेलेल्या 15 वर्षीय मुलीचा संशयास्पद मृत्यू

टीम लय भारी

वर्धा : वर्ध्यातून 15 वर्षीय मुलीला एका मुलाने फूस लावून पळवून दिल्लीत नेते परंतु त्या मुलीच्या मृत्यूची बातमी येऊन धडकल्याने मुलीच्या कुटुंबावर दुःखाचे डोंगर कोसळले आहे. पंधरा दिवसांपूर्वी मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार त्या मुलीच्या कुटुंबियांनी दिली होती, परंतु मुलीचा मृतदेह ताब्यात घेण्यासाठी जेव्हा पोलिसांचा फोन आला तेव्हा हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी अजिंक्य सकट या तरुणावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार, वर्धा येथील नामांकित शाळेत पीडित मुलगी नववीच्या वर्गात शिकत होती. 10 जुलै रोजी घरातील सगळे झोपले असताना या मुलीने पहाटेच्या सुमारास घरातून अजिंक्य सकट या तरुणासोबत पलायन केले. सकाळी उठल्यानंतर घरात मुलगी दिसून न आल्याने मुलीच्या कुटुंबियांनी शोध घेण्यास सुरूवात केली परंतु तरीही मुलगी न सापडल्याने मुलीच्या घरच्यांनी थेट पोलिस ठाणे गाठत अपहरणाची तक्रार नोंदवली.

दरम्यान, साधारण पंधरा दिवसांनंतर मुलीच्या आईला फोन आला, त्यावेळी मुलीची तब्येत ठीक नसल्याने तिला खाजगी रुग्णालयात दाखल केले असल्याचे सांगण्यात आले. सलाईन सुरू असल्याचे मुलीने यावेळी आईला सांगितले, मात्र त्यानंतर अजिंक्य या मुलाने आधारकार्ड सह इतर कागदपत्रांची सुद्धा मागणी केली, त्यावेळी खोलात चौकशी केली असता मुलीचा मृत्यू झाल्याचे समोर आले, शिवाय दिल्ली पोलिस सुद्धा मुलीचा मृतदेह ताब्यात देण्यासाठी कागदपत्रांची विचारणा करू लागल्याचे कळताच तात्काळ आईने जवळचे पोलिस स्टेशन गाठले.

वर्धा पोलिसांनी या घटनेची नोंद करून घेतली असून पोलिसांचे एक पथक दिल्लीला रवाना करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. दरम्यान याआधी सुद्धा अजिंक्य या मुलाने या मुलीला फूस लावून पळवून नेले होते, तेव्हा कुटुंबियांनी तिचा शोध घेत पुन्हा घरी आणले होते. दोघांना त्यावेळी समज दिली होती, तर मुलाला पुढच्यावेळी असे कृत्य केल्यास गुन्हा दाखल करू असे मुलीच्या कुटुंबियांकडून तंबी देण्यात आली होती.

हे सुद्धा वाचा…

सीएसएमटी स्थानकातून पनवेलला जाणारी ट्रेन बफरला धडकली

‘त्यांचे केवळ राजकारणासाठी हिंदुत्व…!’ शिवसेनाप्रमुख ठाकरेंचा शिंदेगटावर थेट आरोप

महाराष्ट्राच्या मातीचं तुम्हाला कधी वैभव दिसलं नाही का…? उद्धव ठाकरेंची तुफान शाब्दिक फटकेबाजी

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!