31 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeटॉप न्यूजयुवासेनेच्या सचिवांना कोरोनाची लागण

युवासेनेच्या सचिवांना कोरोनाची लागण

टीम लय भारी

मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या रोजच वाढत आहे. एकीकडे संसर्ग वाढत असताना कोरोनाचे नवे रुप ओमिक्रॉनचादेखील धोका वाढला आहे. आता नेतेमंडळींनाही कोरोनाची लागण होताना दिसत आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. तसेच भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना ओमिक्रॉन विषाणूची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यानंतर आता आता युवासेनेचे सचिव वरूण सरदेसाई यांनादेखील कोरोनाची लागण झाली आहे. फेसबुकद्वारे त्यांनी ही माहिती दिली आहे(Corona infection in Yuvasena secretary). 

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. मुंबई यारख्या शहरात पुन्हा लॉकडाऊन करण्यावर विचार सुरु आहे तर दुसरीकडे राज्यातील बडे नेते कोरोनाबाधित होत आहेत. सध्या युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाची सौम्य लक्षणे आढल्यानंतर त्यांनी चाचणी करुन घेतली होती. त्यानंतर चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांनी स्वत:ला विलगीकरणात ठेवलं आहे.

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची कोविड-19 चाचणी पॉझिटिव्ह

‘लवकरच मुंबईत लॉकडाऊनचा विचार करू’

तसेच माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी स्वत:ची कोरोना चाचणी करुन घ्यावी असे आवाहन त्यांनी केले आहे. फेसबुक पोस्टद्वारे त्यांनी ही माहिती दिली आहे. तसेच याआधी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता युवासेनेने आपला झंझावात हा मेळावा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबईत 9 लाख मुला मुलींच्या लसीकरणासाठी पालिका सज्ज, लसीकरण केंद्राची यादी एका क्लिकवर

Shiv Sena MP Wants Larger Women Representation In Marriage Amendment Bill Panel

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी