29 C
Mumbai
Friday, May 10, 2024
Homeआरोग्यमुंबईत 9 लाख मुला मुलींच्या लसीकरणासाठी पालिका सज्ज, लसीकरण केंद्राची यादी एका...

मुंबईत 9 लाख मुला मुलींच्या लसीकरणासाठी पालिका सज्ज, लसीकरण केंद्राची यादी एका क्लिकवर

टीम लय भारी

मुंबई: मुंबईसह महाराष्ट्रात आजपासून किशोरवयीन मुलांचं लसीकरण सुरु होतंय. त्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज झालीय. ज्यांचं वय 15 ते 18 वर्षा दरम्यान आहे अशा सर्व मुला मुलींनी कोरोना प्रतिबंधक लस देण्यात येणार आहे. मुंबईत त्याची सुरुवात आदित्य ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे.( Mumbai  9 lakh boys and girls, Municipal Corporation ready for vaccination)

फक्त मुंबईच नाही तर पुणे, ठाणे, औरंगाबाद, नागपूर, नाशिक ह्या महत्वाच्या शहरातही शाळकरी (किशोरवयीन) मुला मुलींसाठी ही लसीकरण मोहीम राबवली जातेय.

ओमिक्रोनचा धोका कायम, यूके व यूएस मधील डेल्टाला मागे टाकले

‘या’ जिल्ह्यात ‘नो वॅक्सिन, नो एंट्री’ चा आदेश

मुंबईतल्या 9 लाख मुलांना लस देण्यात येणार आहे. (Mumbai Corona vaccine center list) त्यासाठी महापालिकेनं 9 जम्बो लसीकरण केंद्र सज्ज केलीयत. सध्या जम्बो लसीकरण केंद्रातून ही लस दिली जाणार आहे तर काही दिवसातच ती शाळेतच कशी उपलब्ध होईल याची सोय केली जाणार आहे. मुंबईत नेमक्या कोणत्या ठिकाणी ही लस उपलब्ध असेल ते पाहुयात.

मुंबईतली लसीकरण केंद्र

  1. ए,बी,सी,डी,ई ह्या पाच प्रशासकीय विभागांसाठी भायखळ्यातल्या रिचर्डसन कुडास कोविड लसीकरण केंद्र
  2. एफ/उत्तर, एल, एम / पूर्व, एम/ पश्चिम या 4 विभागांसाठी सायनच्या सोमय्या मैदानावरील जम्बो कोविड लसीकरण केंद्र
  3. एफ/ दक्षिण जी/ दक्षिण जी/ उत्तर ह्या तीन विभागांसाठी वरळीचं एनएससीय डोम जम्बो कोविड लसीकरण केंद्र
  4. एच/ पूर्व के/ पूर्व एच/ पश्चिम ह्या तीन विभागासाठी वांद्रे कुर्ला संकुलातील बीकेसी जम्बो कोविड सेंटर
  5. के पश्चिम/ पी दक्षिण/ ह्या दोन विभागासाठी गोरेगाव पूर्वचं नेस्को जम्बो कोविड लसीकरण केंद्र
  6. आर/ दक्षिण पी/ उत्तर ह्या दोन विभागांसाठी मालाड पश्चिमचे मालाड जम्बो कोविड लसीकरण सेंटर
  7. आर /मध्य, आर/ उत्तर ह्या विभागांसाठी दहिसर जम्बो कोविड लसीकरण सेंटर
  8. एन एस विभागासाठी कांजूरमार्ग पूर्वचं क्रॉप्टन अँड ग्रीव्हज जम्बो कोविड लसीकरण सेंटर
  9. टी विभागासाठी मुलुंड पश्चिम मधील रिचर्डसन कुडास मुलुंड जम्बो कोविड लसीकरण केंद्र
  10. परळमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रेल्वे रुग्णालय इथे रेल्वे कर्मचाऱ्यांच्या मुला मुलांसाठी लसीकरण केंद्र

दिलासा! महाराष्ट्रात ओमिक्रॉनचा समूह संसर्ग नाही; बूस्टर डोसबाबत पुढच्या आठवड्यात निर्णय

Assembly elections 2022: ‘Accelerate’ COVID-19 vaccination, Election Commission tells poll-bound states

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी