31 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeक्रिकेट'या' चूका महेंद्रसिंग धोनीवर बंदी घालणार; वीरेंद्र सेहवागचा सज्जड इशारा

‘या’ चूका महेंद्रसिंग धोनीवर बंदी घालणार; वीरेंद्र सेहवागचा सज्जड इशारा

यंदाचा आयपीएल हंगाम सुरू झाल्यापासून चेन्नई सुपरकिंग्जचे अनेक गोलंदाजांनी अतिरिक्त धावा दिल्यामुळं सीएसकेवर टीका केली जात आहे. चेन्नई सुपर किंग्सचे गोलंदाज सातत्याने अतिरिक्त धावा देणार असतील तर त्यांना दुसऱ्या खेळाडूच्या नेतृत्वाखाली खेळावं लागणार असल्याचा सज्जड इशारा धोनीने सीएसकेच्या गोलंदाजांना दिला होता. दरम्यान आता सीएसकेच्या गोलंदाजांच्या सुमार कामगिरीवर भारताचा माजी सलामीवीर विरेंद्र सेहवागने संताप व्यक्त केला आहे. आरसीबीविरुद्धच्या सामन्यात धोनी आनंदात दिसत नव्हता, असं सेहवागने म्हटलं आहे.

भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागने, चेन्नई सुपर किंग्जच्या गोलंदाजांना महेंद्रसिंग धोनीच्या कर्णधारावरील ‘बंदी’चा धोका टाळण्यासाठी तयारी करण्यास सांगितले आहे. सोमवारी बेंगळुरूमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्धच्या आयपीएल सामन्यात सुपर किंग्जने सहा बाद 226 धावा केल्या परंतु गोलंदाजांनी सहा वाइड गोलंदाजी केल्यामुळे संघाला लक्ष्याचा बचाव करण्यासाठी संघर्ष करावा लागला.

चेन्नई सुपर किंग्जच्या गोलंदाजांना इशारा देताना सेहवाग क्रिकबझवर म्हणाला, “या सामन्यात धोनी खूश दिसत नव्हता. वाइड्स आणि नो बॉल कमी करण्याची गरज असल्याचे त्याने यापूर्वीही म्हटले आहे. रविवारी त्यांनी सहा वाईड म्हणजेच एक अतिरिक्त षटक टाकले. हे योग्य नाही. मला भीती वाटते की, या चुका चेन्नई सुपर किंग्जला धोनीवर बंदी घालण्याच्या परिस्थितीत घेऊन जाऊ शकतात.”

त्याचप्रमाणे सेहवागची ही भीती रास्तही आहे. चेन्नई सुपर किंग्जचा संघ विजयी मार्गावर परतला असला, तरी त्याच्या गोलंदाजांमध्ये शिस्तीचा अभाव अजूनही दिसून येत आहे. संघ प्रत्येक सामन्यात अतिरिक्त धावा देत असल्याने डावाची षटके वेळेवर संपत नाहीत. त्यामुळे कर्णधाराला सतत स्लो ओव्हर रेटचा फटका सहन करावा लागतो. ज्यामुळे त्याच्यावर एक-दोन सामन्यांची बंदी घालण्यात येते.

कर्णधारपद सोडण्याचा इशारा
लीगच्या सुरुवातीला लखनऊ सुपर जायंट्सविरुद्धच्या सामन्यादरम्यान धोनीने आपल्या गोलंदाजांना सावध केले होते. त्या सामन्यात चेन्नईने 13 अतिरिक्त चेंडू टाकले होते. तेव्हा धोनी म्हणाला होता, की जर गोलंदाज सुधारले नाहीत, तर तो कर्णधारपद सोडेल आणि संघाला नव्या कर्णधारासोबत खेळावे लागेल.

हे सुद्धा वाचा:

सामना जिंकूनही धोनीने दिली चेन्नईचे कर्णधारपद सोडण्याची WARNING!

IPL 2023: लाइव्ह मॅचमध्ये कोहलीची गांगुलीला खुन्नस; हस्तांदोलनही टाळले!

IPL 2023 :’या’ चुकीमुळे हार्दिक पांड्याला पडला 12 लाखांचा दंड!

IPL 2023, Dhoni, CSK, IPL, Virender Sehwag, cricket, IPL 2023: Dhoni may banned if CSK bowlers score extra runs in IPL: Virender Sehwag

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी