30 C
Mumbai
Thursday, May 9, 2024
Homeक्राईमगँगस्टर छोटा राजनच्या मॅनेजरला अटक

गँगस्टर छोटा राजनच्या मॅनेजरला अटक

गँगस्टर छोटा राजन याचा मॅनेजर अबू सावंत उर्फ संतोष महादेव सावंत याला अटक करण्यात आली आहे. अबू सावंत याला सीबीआय ने अटक केली आहे.अबू सिंगापूर मध्ये होता. त्याच प्रत्यार्पण करण्यात आलं आहे.

छोटा राजन हा देशातील एक मोठा गँगस्टर आहे. त्याच्या विरोधात खून , . खुनाचा प्रयत्न , अपहरण , खंडणी उकळणे, धमक्या देणे अशा प्रकारचे 71 गुन्हे आहेत. 2015 सालात राजन याला भारतात आणण्यात आलं. तो सध्या जेल मध्ये आहे. राजन हा परदेशात असताना अबू सावंत हा त्याच्या सोबत सतत असायचा. त्याचा मॅनेजर म्हणून काम पहायचा.छोटा राजनचे सर्व आर्थिक व्यवहार हा पहायचा.

अबू सावंत हा पैशाचे व्यवहार पाहणे, बिल्डरांना धमक्या देणे , खंडणी उकळणे असे गुन्हे ही करायचा. अबू हा गेली वीस वर्षे छोटा राजन यांच्या सोबत असून त्याची महत्वाची काम पहायचा.अबू आणि छोटा तकेलंराजन याची पत्नी सुजाता निकाळजे या दोघांनी मिळून 2005 सालात एका बिल्डर ला धमकावले होतं.बिल्डर कडे असलेला प्रोजेक्ट त्याने खुशी डेव्हलपर ला द्यावा या साठी धमक्या दिल्या होत्या. खुशी हे छोटा राजन यांच्या मुलीचं नाव असून तिच्या नावाने कम्पनी आहे. तर कंपनीचे मालक सुजाता निकाळजे ही आहे. याबाबत अबू आणि सुजाता निकाळजे यांच्या विरोधात 2006 सालात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात सुजाता हिला अटक झाली आहे. मात्र, अबू सावंत हा फरार होता.

अबू सावंत हा छोटा राजन याचा सर्वात विश्वासू म्हणून ओळखला जातो. डी के राव यांच्या नंतर गँगमध्ये याचा नंबर लागतो. छोटा राजन याच्यावर 2002 सालात विरोधी गॅंगने हल्ला केल्यानंतर छोटा राजन यांच्या पासून हेमंत पुजारी , रवी पुजारी, बंटी पांडे ,संतोष शेट्टी, इजाज लकडावाला यांनी साथ सोडली. ते वेगळे होऊन गँग चालवू लागले. या काळात संतोष सावंत उर्फ अबू सावंत याने छोटा राजनची साथ सोडली नाही.

हे सुद्धा वाचा

ईडीविरोधातील जनहित याचिकेवर मुंबई हायकोर्टात होणार सुनावणी

दाभोळकरांच्या हत्येचा तपास हायकोर्टाच्या देखरेखीखाली होणार नाही

‘या’ चूका महेंद्रसिंग धोनीवर बंदी घालणार; वीरेंद्र सेहवागचा सज्जड इशारा

अबू सावंत यांच्या विरोधात 7 गुन्हे दाखल आहेत. हे गुन्हे खून , खंडणी उकळणे आणि धमक्या देणे या प्रकारचे आहेत. हा आणि सुजाता निकाळजे एका गुन्ह्यात एकत्र आरोपी आहेत. छोटा राजन ला भारतात आणल्या नंतर त्याचे सर्व गुन्हे सीबीआयकडे सुपूर्द करण्यात आलेत. हे सर्व खटले सीबीआय चालवत आहे.यामुळे अबू सावंत याला सीबीआयने ताब्यात घेतलं आहे. त्याच्या विरोधात ही सीबीआय सर्व खटले चालवणार आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी