33 C
Mumbai
Saturday, May 11, 2024
Homeक्राईम"नाहीतर अडचणीत येशील"; लॉरेंस बिश्नोई गैंगकडून राखी सावंतला धमकीचा मेल

“नाहीतर अडचणीत येशील”; लॉरेंस बिश्नोई गैंगकडून राखी सावंतला धमकीचा मेल

बॉलिवूडची कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन राखी सावंत तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे सतत चर्चेत असते. राखी सलमान खानला तिचा मोठा भाऊ मानते. त्यामुळेच सलमान खानला जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्यावर तिने आपली प्रतिक्रिया दिली होती. यावर राखीला धमकीचे प्रत्युतर मिळाले आहे. लॉरेंस बिश्नोई गैंगकडून धमकीचा हा मेल बॉलीवूडची ड्रामा क्वीन राखी सावंतला पाठवण्यात आलाय. या मेलमध्ये म्हटलं आहे, सलमान खानला आता आम्ही बॉम्बेमध्ये मारू. तू (राखी – सावंत) यामध्ये पडू नकोस. नाहीतर अडचणीत येशील. हे पहिल्यांदा घडलेले नाही की, सलमानला अशी धमकी देण्यात आली. याआधी अनेकदा सलमानला धमक्या मिळाल्या आहेत. मात्र सलमानविषयी बोलल्याने राखी सावंतच्या अडचणीत वाढ झाली आहे.

आज सकाळी राखी सावंतला मेल आयडीवर एक मेल आला होता. जेव्हा मेल उघडला तेव्हा अभिनेता सलमान खान आणि राखी सावंतला जीवे मारण्याबद्दल लिहिले होते. हा मेल गुर्जर प्रिंस नावाच्या व्यक्तीने पाठवला आहे, जो स्वतःला लॉरेंस बिश्नोई ग्रुप/गोल्डी बरार ग्रुपमधील सदस्य असल्याचे म्हणत आहे. मेलमध्ये लिहिलंय- “जय बालकारी, राखी आपली कुठलीही बांडणे नाहीत, तू सलमान खानच्या मॅटरमध्ये पडू नकोस, नाही तर अडचणीत येशील.

पुढे मेलमध्ये लिहिलंय की, तुझा भाऊ सलमानला आम्ही बॉम्बेमध्येच मारू. तो कितीही सुरक्षा वाढवू दे. आता यावेळी सिक्युरिटीमध्येच मारणार, ही लास्ट वॉर्निंग आहे राखी तुझ्यासाठी नाही तर तू तयार राहा.” हा मेल राखीला दोन वेळा पाठवण्यात आलाय. पहिल्यांदा सकाळी 7 वाजून 22 मिनिटांवर आणि दुसऱ्या दुपारी 1 वाजून 19 मिनिटांवर मेल आला.

काय म्हणाली होती राखी?
‘मी अल्लाला प्रार्थना करते की माझा भाऊ सलमानबद्दल कोणीही वाईट विचार करू नये. एवढेच नाही तर राखी सावंतने बिश्नोई समाजाची माफी मागितली. कान पकडून सिट-अपही केले. हात जोडून ती सलमान खान भाईच्या वतीने बिश्नोई समाजाची माफी मागते. ती म्हणते की अभिनेत्यावर वाईट नजर ठेवू नका. त्यांना लक्ष्य करू नका.

हे सुद्धा वाचा:

बॉलीवूडच्या भाईजानला जीवे मारण्याची धमकी; गँगस्टर गोल्डी ब्रार, लॉरेन्स बिश्नोईचा धमकीच्या ई-मेलमध्ये उल्लेख

सलमान खाननंतर आता संजय राऊतांना लॅारेन्स बिश्नोई गॅंगकडून जीवे मारण्याची धमकी

अभिनेता सलमान खान याला धमकी देणारा बालक पोलिसांच्या ताब्यात

Rakhi Sawant, Lawrence Bishnoi, Salman Khan, Rakhi Sawant gets Threat mail from Lawrence Bishnoi gang

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी