31 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeक्राईमखारघर उष्माघात प्रकरणी आम आदमी पक्षाची कोर्टात धाव

खारघर उष्माघात प्रकरणी आम आदमी पक्षाची कोर्टात धाव

खारघर येथे पार पडलेल्या समाज भूषण पुरस्काराच्या वेळी उष्माघाताने 13 जनांचा मृत्यू झाला आहे.या प्रकरणी आयोजकांवर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी आम आदमी पक्षाच्या वतीने पनवेल कोर्टात अर्ज करण्यात आला आहे.पोलीस कारवाई करत नसल्याने आता कोर्टाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश द्यावेत, अस अर्जात म्हटलं आहे.

खारघर येथे 16 एप्रिल रो जी समाज भूषण पुरस्कार सोहळा पार पडला. हा सोहळा सिडको च्या भव्य मैदानात पार पडला.हा पुरस्कार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना देण्यात आला. यावेळी धर्माधिकारी यांच्या संस्थेचे सुमारे 10 लाख श्री सदस्य हजर होते.राज्य भारतातून हे श्री सदस्य आले होते.हे सर्व उघड्या मैदानात बसले होते.त्या दिवशी तापमान 42 डिग्री होत.प्रचंड ऊन होत.त्यामुळे त्याचा अनेक श्री सदस्य यांना त्रास झाला.यावेळी 13 श्री सदस्य उष्माघाताने मृत्यू पावले आहेत.

याबाबत बरीच आरडाओरड झाली.आयोजकांवर टीका झाली.नेते एसी मंडपात आणि जनता उघड्यावर होती,अशी टीका झाली.यानंतर 13 श्री सदस्य यांच्या मृत्यू बाबत अयोजकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी सर्वच विरोधी राजकीय पक्षांनी केली.या घटनेला आता 12 दिवस उलटलेत.मात्र, पोलिसांकडून कोणतीच कारवाई झालेली नाही. यामुळे आम आदमी पक्षाने या प्रकरणात कोर्टात धाव घेतली आहे.पक्षाने फौजदारी संहिता 1973 नुसार कोर्टात कलम 156(3) नुसार अर्ज केला आहे.हा अर्ज स्थानिक पनवेल कोर्टात केला आहे.

हे सुद्धा वाचा

बारसू रिफायनरी प्रकल्प: ठाकरेंनी त्यावेळेस का विरोध केला नाही? मुख्यमंत्र्यांचा खोचक सवाल

बारसू प्रकल्पाबाबत चर्चेतून मार्ग काढा; शरद पवारांचा उदय सामंतांना सल्ला

हनुमान जन्मस्थळ कर्नाटकात; योगी आदित्यनाथांच्या वक्तव्यानंतर जन्मस्थळाचा वाद पुन्हा उफाळणार ?

या अर्जात आयोजक यांच्यावर भादवी कलम 304,308 , 336 , 337,338 आणि 114 कारवाई करण्याचे पोलिसाना आदेश द्यावेत, अशी मागणी केली आहे. या अर्जावर पनवेल कोर्टात लवकरच सुनावणी होणार असल्याच, आम आदमी पक्षाचे राज्याचे सरचिटणीस धनंजय शिंदे यांनी सांगितलं.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी