29 C
Mumbai
Tuesday, May 7, 2024
Homeराजकीयहनुमान जन्मस्थळ कर्नाटकात; योगी आदित्यनाथांच्या वक्तव्यानंतर जन्मस्थळाचा वाद पुन्हा उफाळणार ?

हनुमान जन्मस्थळ कर्नाटकात; योगी आदित्यनाथांच्या वक्तव्यानंतर जन्मस्थळाचा वाद पुन्हा उफाळणार ?

सध्या कर्नाटक निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले आहे. त्यातच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हनुमान जन्मस्थळ कर्नाटकात असल्याचे वक्तव्य केल्याने नाशिकच्या महंतांमध्ये नाराजी पसरली आहे. योगींनी हनुमान जन्मस्थळ कर्नाटकात असल्याचे वक्तव्य प्रचारादरम्यान केले होते. त्यावर नाशिकच्या साधू महंतांनी आक्षेप घेत योगींनी धर्मात राजकारण करु नये असा सल्ला दिला आहे.

कर्नाटक निवडणूकीच्या प्रचाराला दिवसेंदिवस धार चढत असून भाजपच्या प्रचारासाठी योगी आदित्यनाथ देखील मैदानात उतरले आहेत. तेथील एका प्रचारसभेत बोलताना योगींनी हनुमान जन्मस्थळ कर्नाटकात असल्याचे म्हटले. त्यानंतर नाशिकच्या साधू महंतांनी योगींच्या वक्तव्याला कडाडून विरोध केला. कर्नाटक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर योगींनी वक्तव्य केल्याचे नाशिकच्या महंतांनी म्हटले आहे.

काही दिवसांपू्र्वी हनुमान जन्मस्थळावरुन वाद देखील उत्पन्न झाला होता. त्यावेळी धर्मपीठांच्या महंतांची धर्मसभा देखील झाली. या धर्मसभेत अंजनेरी येथे हनुमान जन्मस्थळ असल्याच्या चर्चांवर विचारमंथन झाल्यानंतर अयोध्येतील आचार्य गंगाधर पाठक यांनी अंजनेरी हेच जन्मस्थळ असल्यावर शिक्कामोर्तब केले होते.

हे सुद्धा वाचा

बारसू प्रकल्पाबाबत चर्चेतून मार्ग काढा; शरद पवारांचा उदय सामंतांना सल्ला

अजित पवार म्हणाले, विरोधक आहे म्हणून काय गचोरीला धरु का ?

महाविकास आघाडी झाली नाही तर २०२४ साठी काँग्रेसचा प्लॅन तयार : नाना पटोले  

अंजनेरी स्थळाला धर्मपीठाचा निर्णय देखील झाला आहे. त्यावर सर्व संमती झाल्यानंतर योगी आदित्यनाथ यांनी अशा पद्धतीने विधान करुन दिशाभूल करु नये. योगींनी धर्मात राजकारण करू नये असा सल्ला नाशिकच्या महंतांनी दिला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी