28 C
Mumbai
Friday, May 10, 2024
Homeमहाराष्ट्रबारसू रिफायनरी प्रकल्प: ठाकरेंनी त्यावेळेस का विरोध केला नाही? मुख्यमंत्र्यांचा खोचक सवाल

बारसू रिफायनरी प्रकल्प: ठाकरेंनी त्यावेळेस का विरोध केला नाही? मुख्यमंत्र्यांचा खोचक सवाल

रत्नागिरी रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल्स प्रकल्पाला राज्यभरातून कडाडून विरोध होत आहे. या आंदोलनात अनेक शेतकरी देखील सहभागी झाले आहेत. प्रकल्पासाठी मातीचे संशोधन करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. याच्या निषेधार्थ सुमारे सहा गावांतील शेकडो लोक रस्त्यावर उतरले. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

एकनाथ शिंदे म्हणाले, खरेतर हा प्रकल्प ग्रीन रिफायनरी आहे. त्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले होते. या पत्राआधारेच पंतप्रधानांनी या प्रकल्पाला हिरवा कंदील दिला होता. ठाकरेंनी त्यावेळेस का विरोध केला नाही. त्यावेळी विशिष्ट परिस्थिती होती की विशिष्ट तडजोडी झाल्या होत्या. आता मुख्यमंत्रिपद गेल्यानंतर विरोध करण्याचे कारण काय? ही त्यांची कुठली भूमिका आहे. मला कळत नाही, असो सवाल देखिल त्यांनी उपस्थित केला आहे.

स्थानिक नागरिकांच्या सहमतीशिवाय बारसू रिफायनरी ग्रीन प्रकल्प केला जाणार नाही. अन्याय करून हा प्रकल्प कुणालाच नको आहे. मुख्यमंत्री पद गेल्याने (ठाकरे) चिडले असून त्यातून त्यांनी हा विरोध उभा केला आहे. समृद्धी महामार्गालादेखील सुरुवातीला ठाकरे यांनी विरोध केला होता, मी खंबीरपणे आणि जिद्दीने हा प्रकल्प पुढे नेला. चांगल्या कामाला विरोध करणे हा दुटप्पीपणा असल्याची टीका शिंदे यांनी ठाकरेंवर केली.

एकनाथ शिंदे सुट्टीवर असल्याची चर्चा रंगली होती. यावर एकनाथ शिंदे म्हणाले, जाहीर कार्यक्रम सुरू आहेत. गावातील उत्सवात सहभागी होत आहे; तरीही कुणाला तरी मी सुटीवर गेल्याचा भास होतो. पदावर असताना जनतेची जबाबदारी सोडून अडीच वर्ष घरी बसलेल्यांनी सुटीवर गेल्याची ओरड करू नये, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली आहे.

हे सुद्धा वाचा: 

अडीच वर्ष घरी बसलेल्यांनी सुटीवर गेल्याची ओरड करू नये; मुख्यमंत्र्यांचा टोला

ठाण्याच्या मुख्यमंत्री कार्यालयाचा 4 कोटींचा बोजा पालिकेच्या तिजोरीवर!

एकनाथ शिंदे यांचा राजीनामा घेऊन भाजप बनविणार पर्यायी सरकार, राज्याला मिळणार नवे नेतृत्व !

Barsu Refinery project, CM Eknath Shinde, Uddhav Thackeray, SHIV SENA, BJP, Barsu Refinery Project: Why Thackeray didn’t protest then? Chief Minister Eknath Shinde’s question

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी