33 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeक्राईमशहीद अतिकच्या हत्येचा सूड घेऊ; 'अल कायदा'चा आतंकी इशारा

शहीद अतिकच्या हत्येचा सूड घेऊ; ‘अल कायदा’चा आतंकी इशारा

कुख्यात गँगस्टर माजी खासदार अतिक अहमदचा 'शहीद' असा उल्लेख करीत 'अल कायदा' या दहशतवादी संघटनेने या हत्येचा बदला घेण्याचा इशारा दिला आहे.

ईद उल फित्रनिमित्त अतिक आणि अशरफ हत्या प्रकरणात दहशतवादीकडून मोठी धमकी मिळाली आहे. अल-कायदाने अतिकच्या हत्येचा बदला घेण्याची धमकी दिली आहे. दहशतवादी संघटना अल-कायदाने सात पानांचे एक प्रकाशन जारी केले आहे. यात अल कायदाने एक पूर्ण परिच्छेद अतिक अहमद व त्याचा भाऊ अश्रफ यांची माध्यमांच्या प्रतिनिधींसमोर गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याचा उल्लेख केला आहे. त्यात अतिकला ‘शहीद’ संबोधण्यात आले असून या घटनेचा सूड घेण्याचा इशारा त्यात देण्यात आला आहे. दिल्लीच्या तिहार तुरुंगात अटकेत असलेल्या संघटनेच्या सदस्यांना सोडवण्याचा इशाराही अल कायदाने दिला आहे.

गुन्हेगारी विश्वातून राजकारणात आलेला माजी खासदार अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अश्रफ अहमद या दोघांची पोलिसांच्या ताब्यात असताना शनिवारी रात्री अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या घालून हत्या केली. त्यांना वैद्यकीय चाचणीसाठी प्रयागराज येथील वैद्यकीय महाविद्यालयात नेलं जात होतं, त्याचवेळी हा हल्ला झाला. हल्लेखोरांनी दोन्ही गँगस्टर बंधूंना गोळ्या झाडून आत्मसमर्पण केलं. 15 एप्रिल रोजी ही भयानक घटना घडली असून संपूर्ण देश तणावात असताना अल कायदा कडून मोठी आतंकी धमकी देण्यात आली आहे.

धमकीच्या पत्रात काय ?
दमनकर्त्यांचे हात रोखण्यात येतील, मग ते व्हाईट हाऊस असो की, दिल्लीतील पंतप्रधानांचे निवासस्थान असो की, रावळपिंडीतील लष्कराचे मुख्यालय असो. टेक्सास ते तिहार ते अड्याला सगळीकडून अल कायदा अटकेतील मुस्लिम बंधू, भगिनींना मुक्त करेल. अतिक अहमद यांना माध्यमांच्यासमोर गोळ्या घालून ठार मारण्यात आले. अतिक अहमद यांना शहादत प्राप्त झाली. याचाही सूड उगवला जाईल.

अतिक अहमद आणि त्याच्या भावाला पत्रकारांसमक्ष गोळ्या घालून ठार करण्यात आले होते. त्याच्या हत्येचे पडसाद देशात काही ठिकाणी उमटले होते. बिहारच्या पाटणा येथील सर्वात मोठ्या मशिदीच्या परिसरात शुक्रवारी अतिक आणि अश्रफच्या नावाने घोषणा देण्यात आल्या होत्या. यानंतर प्रकरण जास्त भडकू नये यासाठी मशिदीच्या इमामांनी अतिकचे प्रकरण उत्तर प्रदेशचे आहे, त्याचा पाटण्याशी संबंध नाही. उगाच कुणी वातावरण खराब करू नये, असे आवाहन करीत सोशल मीडियाच्या माध्यमातून शांततेचे आवाहन केले आहे.

हे सुद्धा वाचा: 

‘अन्याय संपला, आम्हाला फाशी झाली तरी…;, अतिक-अश्रफच्या मारेकऱ्यांचा जबाब

प्रसार माध्यमांशी बोलत असतानाच झाली चकमक; गँगस्टर बंधूंच्या हत्येचा थरारक व्हिडिओ व्हायरल

योगी सरकारचा अ‍ॅक्शन मोड : गँगस्टर बंधूंच्या हत्येनंतर यूपीत कलम 144 लागू; इंटरनेट बंद, 17 पोलिसांचे निलंबन!

Avenging Atiq’s murder; Al Qaeda terror warning, Al Qaeda warns to Avenging Atiq murder

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी