33 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeक्राईम"अन्याय संपला, आम्हाला फाशी झाली तरी...", अतिक-अश्रफच्या मारेकऱ्यांचा जबाब

“अन्याय संपला, आम्हाला फाशी झाली तरी…”, अतिक-अश्रफच्या मारेकऱ्यांचा जबाब

गुन्हेगारी विश्वातून राजकारणात आलेला माजी खासदार अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अश्रफ अहमद या दोघांची पोलिसांच्या ताब्यात असताना शनिवारी रात्री अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या घालून हत्या केली. त्यांना वैद्यकीय चाचणीसाठी प्रयागराज येथील वैद्यकीय महाविद्यालयात नेलं जात होतं, त्याचवेळी हा हल्ला झाला. हल्लेखोरांनी दोन्ही गँगस्टर बंधूंना गोळ्या झाडून आत्मसमर्पण केलं. पोलिसांनी आरोपींना अटक करून नैनी कारागृहात कैद केले होते, मात्र तिन्ही आरोपींच्या जीवाला धोका असल्याने त्यांना आता नैनी कारागृहातून प्रतापगड कारागृहात हलवण्यात आले आहे. लवलेश तिवारी, अरुण मौर्य आणि सनी अशी अतिक आणि अशरफवर हल्ला करणाऱ्यांची नावे आहेत. प्रयागराजमध्ये घडलेल्या या घटनेमुळे सगळीकडेच तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे.

आरोपीने पोलिस चौकशीत सांगितले की, माफिया अतिकचे पाकिस्तानशी संबंध होते. त्याने आणि त्याच्या टोळीतील सदस्यांनी अनेक निष्पाप लोकांची हत्या केली होती. जमीन हडप करण्यासाठी अतिक मारायचा आणि त्याच्याविरुद्ध साक्ष देणाऱ्यांनाही सोडत नव्हता. त्याचा भाऊ अशरफही हे कृत्य करायचा, म्हणून आम्ही दोघांची हत्या केली, असा जबाब आरोपींनी दिला आहे. दरम्यान, चौकशीत तिन्ही आरोपींनी आतिक आणि अश्रफ आमच्या निरपराध भावांची हत्या करत असल्याचे सांगितले. पुढे आरोपी म्हणाले की, आम्ही धर्माचे काम केले आहे. अन्याय संपला. आमचा कोणताही राग नाही. आम्हाला फाशी झाली तरी आनंद होईल. आम्ही आमचे काम केले आहे.

मुख्यतः या खळबळजनक हत्याकांडाचा तपास करण्यासाठी राज्य पोलिसांकडून दोन विशेष तपास पथके (एसआयटी) तयार करण्यात येणार आहेत. घटनास्थळी पत्रकार म्हणून भासवणाऱ्या हल्लेखोरांनी हत्येनंतर ‘जय श्री राम’चा नारा दिला आणि पोलिसांना स्वतःहून शरण आल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. दरम्यान शूटर्सकडे तीन बनावट मीडिया ओळखपत्र, एक मायक्रोफोन आणि कॅमेरा आढळून आला होता. या घटनेत लवलेश जखमी झाला असून त्याच्या पायाला गोळी लागल्याने त्याच्यावर सध्या वैद्यकीय उपचार सुरू आहेत.

हे सुद्धा वाचा: 

माफिया आतीक अहमद आणि अशरफची गोळ्या घालून हत्या

प्रसार माध्यमांशी बोलत असतानाच झाली चकमक; गँगस्टर बंधूंच्या हत्येचा थरारक व्हिडिओ व्हायरल

योगी सरकारचा अ‍ॅक्शन मोड : गँगस्टर बंधूंच्या हत्येनंतर यूपीत कलम 144 लागू; इंटरनेट बंद, 17 पोलिसांचे निलंबन!

Atiq-ashraf shot dead : we will be happy even if hanged, Atiq -Ashraf killer reply, Atiq-ashraf shot dead, encounter took place while talking to the media; Thrilling video viral, atiq-ahmed shot dead

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी