32 C
Mumbai
Saturday, May 11, 2024
Homeक्राईमप्रसार माध्यमांशी बोलत असतानाच झाली चकमक; गँगस्टर बंधूंच्या हत्येचा थरारक व्हिडिओ व्हायरल

प्रसार माध्यमांशी बोलत असतानाच झाली चकमक; गँगस्टर बंधूंच्या हत्येचा थरारक व्हिडिओ व्हायरल

गुन्हेगारी विश्वातून राजकारणात आलेला माजी खासदार अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशर्रफ अहमद या दोघांची पोलिसांच्या ताब्यात असताना शनिवारी रात्री अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या घालून हत्या केली. त्यांना वैद्यकीय चाचणीसाठी प्रयागराज येथील वैद्यकीय महाविद्यालयात नेलं जात होतं, त्याचवेळी हा हल्ला झाला. हल्लेखोरांनी अतिकला संपवून आत्मसमर्पण केलं, पोलिसांनी तिगांना अटक केली आहे. दरम्यान, या घटनेमुळे प्रयागराजमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशमध्ये दोन दिवसांपूर्वी उमेश पाल हत्याप्रकरणातील आरोपींचा एन्काऊटर करण्यात आला होता. अतिक अहमदचा मुलगा असद आणि त्याचा साथीदार गुलाम हे दोघेही पोलीस चकमकीत ठार झाले होते. त्यानंतर, आता या प्रकरणी अटकेत असलेला आरोपी अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ अहमद या दोघांची हत्या करण्यात आली आहे. विशेष म्हणजे मीडियाला बाईट देत असतानाच या दोघांवर गोळ्या झाडण्यात आल्या आहेत. त्यामुळे, या दोघांच्या हत्येचा व्हिडिओ लाईव्ह रेकॉर्ड झाला असून तो व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.

झांसीत ज्या दिवशी असदच्या एन्काऊंटरची घटना घडली, त्यादिवशी  माफिया अतिक अहमदला प्रयागराज कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी मुलाच्या मृत्यूची बातमी ऐकताच अतिक कोर्टातच ढसाढसा रडला. विशेष म्हणजे आज मुलाच्या दफनविधीसाठीही त्याला नेले नव्हते. आज प्रयागराज येथील रुग्णालयात नेत असताना अतिक आणि अश्रफ यांच्यावर गोळीबार झाला. या घटनेचा थरात व्हिडिओत कैद झाला असून सोशल मीडियावर अतिक अहमद ट्रेंड सुरू झाला आहे. या ट्रेंडमध्ये या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियातून व्हायरल झाला आहे.

Sensitive Content Warning :

हल्ला करणाऱ्या तिघांनीही सरेंडर केले असून पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. हल्ला करणाऱ्या या तिघांची नावे, लवलेश, सन्नी आणि अरुण असल्याचे बोलले जात आहे. तसेच पोलीस पुढील तपास करत आहेत. या घटनेचा व्हिडिओदेखील सोशल मिडियावर जबदस्त व्हायरल होत आहे. यात अतीक आणि अश्रफ माध्यम प्रतिनिधींसोबत बोलताना दिसत आहे. याच दरम्यान त्यांच्यावर हल्ला होतो. दरम्यान, हल्ला करणारे तीनही तरुण माध्यम प्रतिनिधी बनून आले होते, असे बोलले जात आहे.

दरम्यान, आजच असदच्या सुपूर्द ए-खाकची प्रथा पूर्ण करताना पोलिसांकडून ड्रोनने निगराणी करण्यात आली होती. सकाळी 9.30 वाजता झांसी येथून प्रयागराजला असद व गुलाम यांचे पार्थिव आणण्यात आले होते. त्यानंतर, असदचे शव थेट कसारी-मसारी कब्रस्तानमध्ये नेण्यात आले. तर, गुलामवर मेहदौरी कब्रस्तान येथे दफविधी करण्यात आला. दरम्यान, दोघांच्याही दफनविधीवेळी मीडिया आणि नागरिकांना दूरवरच उभे केले होते. केवळ, जवळच्या 25 नातेवाईकांना कब्रस्तानमध्ये प्रवेश देण्यात आला होता. मुलाच्या दफनविधीसाठीही अतिकला नेण्यात आलं नव्हतं.

हे सुद्धा वाचा: 

योगी सरकारचा अ‍ॅक्शन मोड : गँगस्टर बंधूंच्या हत्येनंतर यूपीत कलम १४४ लागू; इंटरनेट बंद, 17 पोलिसांचे निलंबन!

माफिया आतीक अहमद आणि अशरफची गोळ्या घालून हत्या

एन्काऊंटरनंतर सोशल मीडियावर योगी बाबा, उत्तर प्रदेश पोलिस ट्रेंडिंग

Atiq-ashraf shot dead, encounter took place while talking to the media; Thrilling video viral, atiq-ahmed shot dead

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी