35 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeक्राईमआर्यन खान ड्रग्स प्रकरण ,मॉडेल मूनमून हिचा खटल्यातून सुटका मिळवण्यासाठी अर्ज

आर्यन खान ड्रग्स प्रकरण ,मॉडेल मूनमून हिचा खटल्यातून सुटका मिळवण्यासाठी अर्ज

कार्डेलिया क्रूझ ड्रग प्रकरणात मॉडेल मूनमून धमीचा हिला आर्यन खान सोबत अटक करण्यात आली होती.हे प्रकरण खूप गाजलं होत.आता आपल्याला या ड्रग्स प्रकरणातुन मुक्त करण्यात याव , यासाठी मूनमून हिने मुंबईच्या विशेष कोर्टात अर्ज केली आहे.

एनसीबीचे झोनल डायरेक्ट समीर वानखेडे यांनी 15 ऑगस्ट 2021 रोजी मोठी कारवाई केली होती.ही कारवाई कार्डेलिया या जहाजावर करण्यात आली होती.या जहाजावर ड्रग्स पार्टी होणार असल्याची त्यांना माहिती मिळाली होती.त्या आधारावर ही कारवाई करण्यात आली होती.यावेळी सुरुवातीला अभिनेता शाहरूख खान याचा मुलगा आर्यन खान यांच्या सह 12 जणांना अटक करण्यात आली होती.कारवाईच्या वेळी मिळालेल्या माहिती नुसार जहाजावर ड्रग्स सापडलं होत.या नंतर आर्यन खान आणि इतरांना अटक करण्यात आली होती.

या कारवाईचा मोठा गहजब झाला होता. एनसीबी चे म्हणणं होतं की आर्यन खान यांच्या मित्रा जवळ ड्रग्स सापडलं होत.तर या प्रकरणात आर्यन खान याला गुणवण्यात आलं असल्याचा आरोप झाला होता.आर्यन खान याचे वडील शाहरुख खान यांच्याकडे एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी पैसे देखील मगितल्याचा आरोप झाला होता.

आर्यन खान सुमारे 21 दिवस तुरुंगात होता. त्याला नंतर मुंबई हायकोर्टाने जामीन दिला होता.इतर ही आरोपी जामिनावर सुटलेत.ज्या दिवशी आर्यन खान याला जामीन दिला. त्याच दिवशी मूनमून धमीजा हिला ही जामीन देण्यात आला.

या प्रकरणात आर्यन खान असल्याने या कारवाई ची मोठी चर्चा झाली होती.या घटनेच्या चौकशी साठी दोन एस आय टी स्थापन करण्यात आल्या होत्या.यातल्या एका एस आय टी ने या कारवाई बाबत काही प्रमाणात संवश्य व्यक्त केला होता. आणि आर्यन खान याला क्लीन चिट दिली होती.

हे देखिल वाचा

पृथ्वीराज चव्हाणांमुळे भीती प्रत्यक्षात उतरली; शरद पवारांची टिप्पणी

उद्धव ठाकरेंमुळेच शिवसेना फुटली; शरद पवारांचा गौप्यस्फोट

मातब्बर आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या ; तुकाराम मुंढे पशुसंवर्धन सचिव !

या प्रकरणात एनसीबीने ऑक्टोबर 2021 मध्ये आरोपपत्र दाखल केलं आहे.त्यात आर्यन खान आणि इतर पाच जण यांना वगळण्यात आलं आहे.त्यांच्या विरोधात महत्वाचा पुरावा नसल्याने त्यांना आरोपी करण्यात आलं नाही.आता मूनमून हीच देखील हेच म्हणणं आहे की, आपल्याला या प्रकरणात गुंतवण्यात आलं आहे.आपला ड्रग्सशी काही संबंध नाही.आपण मॉडेल आहोत. आपल्या ला गेस्ट म्हणून बोलावण्यात आलं होतं.म्हणून आपण गेलो होतो, अस तीच म्हणणं आहे.त्याच्या वतीने ऍड काशीद देशमुख हे बाजू मांडत आहेत.

Aryan Khan drug case, model Moonmoon’s application for release from trial

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी