31 C
Mumbai
Thursday, May 2, 2024
Homeराजकीयउद्धव ठाकरेंमुळेच शिवसेना फुटली; शरद पवारांचा गौप्यस्फोट

उद्धव ठाकरेंमुळेच शिवसेना फुटली; शरद पवारांचा गौप्यस्फोट

शरद पवार यांच्या ‘लोक माझे सांगाती’ या राजकीय आत्मकथेची सुधारित आवृत्ती मंगळवारी प्रकाशित करण्यात आली. त्यात शरद पवार यांनी अनेक गुपिते उघड केली आहेत. उद्धव ठाकरे यांच्याबाबतही शरद पवार यांनी पुस्तकात टिप्पणी केली आहे. शिवसेना कोसळण्यापूर्वी निर्माण झालेल्या पेचप्रसंगात उद्धव ठाकरे यांनी पहिल्या टप्प्यात माघार घेतली. संघर्ष न करता त्यांनी राजीनामा दिल्यामुळे शिवसेनेला विराम मिळाला,” असं म्हणतं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (UBT) प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. पवार यांचे राजकीय आत्मचरित्र ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकाच्या सुधारित अवृत्तीचे प्रकाशन काल (2 मे) पार पडले. याच पुस्तकात पवार यांनी ठाकरे यांच्याविषयी भाष्य केलं आहे.

मुख्यमंत्री झाल्यावरही उद्धव ठाकरेंनी पँट-शर्टमध्ये वावरणे हे एक अप्रूप होते. कोरोना काळात त्यांनी फेसबुकद्वारे साधलेला संवाद जनतेला फारच भावला होता. सामान्य मुंबईकरांत व सरकारी कर्मचाऱ्यांत ठाकरेंबाबत आपुलकी होती. ठाकरेंना काही शारीरिक समस्यांमुळे अडचणी आल्या तरी मंत्रालयात दोनदा जाणे आमच्या पचनी पडणारे नव्हते. आघाडीसाठी मी पुढाकार घेतल्याने त्याचे जनकत्व व पालकत्व माझ्याकडे होते. या नात्याने मी त्यांच्याशी बोलायचो. त्याची कार्यवाही ते करायचे; पण राज्याचे प्रमुख म्हणून ते कमी पडले. राज्याच्या प्रमुखाला सर्व बित्तंबातमी हवी. त्याचे यावर बारीक लक्ष हवे; पण अनुभव नसल्याने त्याची कमतरता जाणवली. त्यामुळे शिवसेनेतील फूट टाळण्यात ते कमी पडले, असे भाष्य पवारांनी केले आहे.

शरद पवारांची नियुक्ती; राष्ट्रवादीत खळबळ

मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये त्यांच्या आत्मचरित्राचे प्रकाशन प्रसंगी शरद पवार यांनी अध्यक्षपद सोडण्याची घोषणा केली, त्यावर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी विरोध केला. मात्र, हा निर्णय मागे घेण्याची मागणी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी पवार यांच्याकडे केली. पवार जोपर्यंत निर्णय मागे घेत नाहीत, तोपर्यंत कार्यक्रमाच्या ठिकाणाहून बाहेर पडणार नसल्याचे त्यांनी सांगितले. दुसरीकडे, शरद पवारांच्या निर्णयाबाबत अजित पवार म्हणाले, की अशा प्रकारे राजीनामा देणे योग्य नाही. याबाबत समितीची बैठक घेऊन त्यानंतर निर्णय घेतला जाईल.

हे सुद्धा वाचा :

साहेबांना हा निर्णय कधी ना कधी घ्यावाच लागणार होता..! अजित पवारांनी काढली कार्यकर्त्यांची समजूत

देवेंद्र फडणवीस म्हणाले, शरद पवारांचा राजीनामा हा त्यांचा वैयक्तिक आणि राष्ट्रवादीचा अंतर्गत प्रश्न

मातब्बर आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या ; अब्दुल सत्ताराच्या मानगुटीवर आता तुकाराम मुंढे !

Sharad Pawar, NCP Sharad Pawar criticized Shiv Sena chief Uddhav Thackeray, NCP, Sharad Pawar, Shiv Sena, Uddhav Thackeray, Sharad Pawar criticized Uddhav Thackeray in lok maze sanagati

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी