30 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeराजकीयपृथ्वीराज चव्हाणांमुळे भीती प्रत्यक्षात उतरली; शरद पवारांची टिप्पणी

पृथ्वीराज चव्हाणांमुळे भीती प्रत्यक्षात उतरली; शरद पवारांची टिप्पणी

महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडी आता कुठपर्यंत जाणार? हा महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या पक्षाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या राजीनाम्याला कार्यकर्त्यांनी विरोध केलाय. तर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शरद पवारांच्या निर्णयांचं समर्थन केलंय. या घटनेमुळे राष्ट्रवादी पक्षात खळबळ उडाली आहे. दरम्यान राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी त्यांच्या ‘लोक माझे सांगाती’ या राजकीय आत्मकथेतून अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. शरद पवार यांनी राज्यात संयुक्त पुरोगामी आघाडीचे सरकार जाण्यास तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनाही निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतर पृथ्वीराज चव्हाणांमुळे भीती प्रत्यक्षात उतरली असल्याची टिप्पणी त्यांनी केली आहे.

तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी घेतलेल्या भूमिकेची आम्हाला चिंता होती. त्यापूर्वी महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची पंधरा वर्षे आघाडी होती. सरकारचा कारभार उत्तम आणि समन्वयाने चालला होता. तो तसा चालण्याचे श्रेय विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे आणि अशोक चव्हाण यांना होते. त्यांनी समजूतदार भूमिका घेतली. त्यामुळे फारसा खडखडाट न होता, तीव्र मतभेद न होता सरकार चालले. पृथ्वीराज चव्हाण राज्यात आल्यानंतर परिस्थिती बदलली. त्यांची स्वच्छ प्रतिमा ही जमेची बाजू होती. परंतु ते सर्वांना बरोबर घेऊन कारभार करतील का, याबाबत आमच्या मनात शंका होत्या.

दिल्लीतल्या काँग्रेस श्रेष्ठींच्या कलेने चालणारे अशीच पृथ्वीराज चव्हाण कुटुंबांची ओळख होती. त्यांची काँग्रेस श्रेष्ठी समवेत असलेली जवळीक राज्याच्या राजकारणात अडचणी निर्माण करू शकेल, अशी आम्हाला सादर भीती होती. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री झाल्यानंतर आम्हाला वाटणारी भीती प्रत्यक्षात उतरली. राष्ट्रवादी कॉंग्रेस आपला घटक आणि मित्रपक्ष या भूमिकेत थोडे अंतर पडायला सुरुवात झाली, असे शरद पवार यांनी नमूद केले आहे. सिंचनप्रकरणी विरोधकांनी अजित पवार यांच्याविरुद्ध आरोपाची राळ उठवली तेव्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस हेच आपले पहिले लक्ष्य असल्याचे मानून पृथ्वीराज चव्हाण यांची वागणूक उभय पक्षांच्या संबंधात ताण निर्माण करणारी ठरली, असा आरोप शरद पवारांनी या पुस्तकात केला आहे.

शरद पवार यांचे राजकीय आत्मचरित्र ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकाच्या सुधारित अवृत्तीचे प्रकाशन काल (2 मे) पार पडले. याच पुस्तकात पवार यांनी अनेक राजकिय घडामोडींवर भाष्य केलं आहे. दरम्यान पक्षाच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होण्याच्या निर्णयानंतर काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे. राजकारणात त्यांना मानाचं स्थान राहील. या निर्णयाचा मविआवर काेणताही परिणाम हाेणार नाही असे नमूद केले.

हे सुद्धा वाचा :

उद्धव ठाकरेंमुळेच शिवसेना फुटली; शरद पवारांचा गौप्यस्फोट

साहेबांना हा निर्णय कधी ना कधी घ्यावाच लागणार होता..! अजित पवारांनी काढली कार्यकर्त्यांची समजूत

देवेंद्र फडणवीस म्हणाले, शरद पवारांचा राजीनामा हा त्यांचा वैयक्तिक आणि राष्ट्रवादीचा अंतर्गत प्रश्न

Sharad Pawar, NCP, lok maze sanagati, Sharad Pawar criticized Prithviraj Chavan in lok maze sanagati

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी