31 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeक्राईमखुनाचा गुन्हा असला तरी, दुष्मनी नव्हती; न्यायालयाने आरोपीला चार वर्षांची शिक्षा ठोठावली

खुनाचा गुन्हा असला तरी, दुष्मनी नव्हती; न्यायालयाने आरोपीला चार वर्षांची शिक्षा ठोठावली

एका खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीला मुंबई सत्र न्यायालयाने आरोपीला चार वर्षांची सक्त मजुरी आणि दोन हजार रुपये दंडांची शिक्षा ठोठावली आहे. मृत व्यक्ती आणि आरोपीची ओळख नव्हती. त्यांच्यात दुष्मनी नव्हती. त्यांच्यात वाद झाला आणि मारामारीमध्ये एकाचा मृत्यू झाला. याप्रकऱणी निकाल देताना न्यायालयाने मृत व्यक्ती आणि आरोपीची ओळख नव्हती किंवा त्यांची दुष्मनी नव्हती, त्यांच्यात वाद झाला आणि मारामारी झाली. त्यांची कोणतीही दुष्मनी नव्हती. हे अचानक पणे घडलेली घटना आहे. यामुळे खून केला अस म्हणता येणार नाही. आरोपी विरोधात जास्त पुरावे कोर्टा समोर न आल्याने, खून नाहीतर मृत्यूस जबाबदार ठरवून त्याला ही शिक्षा देण्यात आली आहे.

ही घटना मुंबईकच्या उपनगरातील आहे. मयत राजेश डोईफोडे आणि योगेश डोईफोडे हे सख्खे भाऊ आहेत. एकदा ते हॉटेलात गेले होते. हॉटेलातून बाहेर आल्यावर मयत राजेश यांच्या खिशातील माचीस काढण्यासाठी एका व्यक्तीने हात घातला. याचा राजेशला राग आला बाचाबाची झाली. खिशात हात घालणाऱ्या व्यक्तीच नाव मोहमद अन्सारी होत. यावेळी अन्सारी याला धडा शिकवण्यासाठी राजेश याने आपल्या ओळखीच्या मुलांना बोलावलं. यावेळी राजेश आणि अन्सारी यांच्यात मारामारी झाली. अन्सारी याने राजेशच डोकं भिंतीवर अनेकदा आपटलं. यात राजेश याचा मृत्यू झाला. याबाबत मोहम्मद अन्सारी याला अटक करण्यात आली. ही घटना 2013 सालातील आहे. इतके दिवस खटला सुरू होता. त्याचा नुकताच निकाल देण्यात आला. यावेळी अन्सारी याला 4 वर्ष सक्त मजुरी आणि दोन हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली.

हे सुद्धा वाचा

नॅशनल क्रश रश्मिका मंदान्ना इंस्टाग्रामवरील ‘या’ फोटोमुळे झाली ट्रोल

महाराष्ट्र भूषण पुरस्कार दुर्घटना : जितेंद्र आव्हाड यांचा खडा सवाल, आता जबाबदारी कोणाची ?
समलिंगी विवाह म्हणजे शहरी उच्चभ्रू वर्गाचे विचार; समलिंगी विवाहला सर्वोच्च न्यायालयाचा विरोध!  

कोर्टाने आपल्या निकालात, हा गुन्हा खुनाचा असला तरी मयत आणि आरोपी हे एकमेकांना ओळखत नव्हते ते अचानक भेटले. त्यांच्यात वाद झाला आणि मारामारी झाली. त्यांची कोणतीही दुष्मनी नव्हती. हे अचानक पणे घडलेली घटना आहे. यामुळे खून केला अस म्हणता येणार नाही. खून करण्याची कोणाला परवानगी नाही. या गुन्ह्यात आरोपीच्या वतीने शिक्षेवर युक्तिवाद करण्यात आला. यावेळी तो घरातील एकमेव कमावता पुरुष आहे. त्याची पत्नी गरोदर आहे. या सर्व बाबी लक्षात घेता आरोपीला 4 वर्षाची शिक्षा सुनावण्यात येत आहे, असे कोर्टाने आपल्या निकालात म्हटलं आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी